सर्व दोषी, सहभागींवर योग्य ती कारवाई केली जाईल – हेमंत नगराळे

सर्व दोषी, सहभागींवर योग्य ती कारवाई केली जाईल   – हेमंत नगराळे

बुधवारी महाराष्ट्राच्या गृह विभागात मोठे बदल करण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. नागराळे हे या आधी राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत होते. पदभार स्विकारल्यानंतर नागराळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी वाझे प्रकरणात बोलताना एनआयए आणि एटीएस योग्य पद्धतीने रितसर तपास करत आहेत असे नागराळे म्हणाले. या प्रकरणी जे दोषी आहेत, सहभागी आहेत त्या सर्वांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे नगराळे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

कोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे?

अखेर परमबीर सिंह यांची हकालपट्टी

परमबीर सिंह यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना अटक करा – अतुल भातखळकर

चांगले सक्षम पोलीस दल म्हणून काम करू. मला सर्वांचे सहकार्य मिळेल अशी मला खात्री आहे. या कार्यात सर्वांनी सहकार्य करावं, जेणेकरुन महाराष्ट्र, मुंबई पोलिसांचे नाव चांगले होईल. कोणतीही टीका मुंबई पोलिसांवर होणार नाही असे नगराळे म्हणाले.

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे. नगराळे यांच्या जागी रजनीश सेठ हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. परमबीर सिंह यांच्याकडे आता गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Exit mobile version