राज्य शासनाकडून अपघातग्रस्तांना १० लाखाची मदत जाहीर

राज्य शासनाकडून अपघातग्रस्तांना १० लाखाची मदत जाहीर

इंदूरहुन महाराष्ट्रात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबाला राज्य शासनाने दहा लाखांची मदत जाहीर केली आहे, याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. तसेच केंद्र सरकराने मृतांच्या कुटुंबाला दोन लाखाची मदत जाहीर केली आहे.

आज, १८ जुलैला इंदूरहून एसटी बस अमळनेरला येत होती. त्यावेळी विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार भरधाव वेगाने येत होता. त्याला वाचवण्यासाठी बस चालकाने बस बाजूला केली असता काही तांत्रिक कारणाने बस थेट नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये अंदाजे ५० ते ६० प्रवासी होते. ज्यामध्ये १३ लहान मुलांचा समावेश होता. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून ८ जणांची ओळख पटली आहे.

हे ही वाचा:

इंदूरहून महाराष्ट्रात येणारी बस नर्मदेत कोसळली; १३ मृत्यू

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटूंबाला १० लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबाला २ लाखाची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना ५० हजाराची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भाजपा आमदार गिरीश महाजन इंदूरला रवाना झाले आहेत.

Exit mobile version