आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीनेही घालायचे हेल्मेट

आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीनेही घालायचे हेल्मेट

मुंबईकरांसाठी एक नवा मोठा नियम आला आहे. मुंबईत दुचाकीस्वाराला हेल्मेटसक्ती आहेच. मात्र आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसानंतर ह्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

मुंबई पोलिसांनी बुधवार, २५ मे रोजी हे आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, मुंबई शहरामध्ये अनेक दुचाकीस्वार हे विनाहेल्मेट दुचाकी चालवतात. तसेच, दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली व्यक्तीही हेल्मेटच वापर करत नाही. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला मोटर वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच वाहतूक परवाना तीन महिन्यांसाठी निलंबीत करण्याची तरतूद आहे, असे मुंबई पोलिसांनी आदेशात म्हटले आहे.

हे ही वाचा:

भाव भडकले; टोमॅटो झाले ‘लाल’

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर

भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याची पंजाब मंत्रिमंडळातून हकालपट्टी

टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

सध्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. तसेच मोटारसायकल चालविणान्याच्या मागे बसलेली व्यक्तीसुद्धा हेल्मेटचा वापर करत नाही. विशेष म्हणजे, मोटार सायकलस्वार यांनी आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे हे मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे. हेल्मेटशिवाय मोटार सायकल चालवल्यास मोटार वाहान कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबीत करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणारा आणि विना हेल्मेट मागे बसणाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आणि तीन महिन्यासाठी परवाना रद्द करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version