नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू !

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू !

नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील शिवपुरी भागात बुधवारी (७ ऑगस्ट) एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे हेलिकॉप्टरने काठमांडूहून उड्डाण करून स्याफ्रुबेन्सीकडे जात असताना हा अपघात झाला. नुवाकोट येथील शिवपुरी राष्ट्रीय उद्यानात हे हेलिकॉप्टर कोसळले. नेपाळ पोलिसांनी सांगितले की, हेलिकॉप्टर दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेल्यांमध्ये चार जण चिनी नागरिक होते. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हे ही वाचा..

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर क्युबाच्या गुझमनची फायनलमध्ये एन्ट्री !

बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्तालयातील १९० कर्मचारी मायदेशी परतले

बांगलादेश हिंसाचार; हिंदू गायकाचे घर जाळले, ९७ ठिकाणी हिंदूंवर हल्ले !

बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय कांद्याला फटका, सीमेवर शेकडो ट्रक ठप्प !

या संदर्भात माहिती देताना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते सुभाष झा म्हणाले की, एअर डायनेस्टीचे ९N-AZD हेलिकॉप्टर काठमांडूहून स्याप्रुबेसी, रसुवाला जाण्यासाठी दुपारी १:५४ वाजता उड्डाण केले होते. मात्र, ते गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वीच क्रॅश झाले. नुवाकोट जिल्ह्यातील सूर्या चौर-७ येथे एका टेकडीवर ते हेलिकॉप्टर कोसळले. हे हेलिकॉप्टर कॅप्टन अरुण मल्ला उडवत होते.

Exit mobile version