27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषकेदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, ६ मृत्यू

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, ६ मृत्यू

Google News Follow

Related

केदारनाथ येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. केदारनाथमध्ये दाट धुकं असून, त्यामुळे हा अपघात झाला असा अंदाज बांधण्यात येतं आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी पथके रवाना झाली आहेत.

आज, १८ ऑक्टोबरला उत्तराखंडमधील केदारनाथपासून दोन किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. कोसळलेले हेलिकॉप्टर हे आर्यन कंपनीचं असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते. केदारनाथहुन हे हेलिकॉप्टर परतत असताना हा अपघात झाला आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथक बचावकार्यासाठी रवाना झाली आहेत.

याआधीही २०१९ आणि २०१३ मध्ये केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. २०१९ मध्ये प्रवाशांना केदारनाथहून फाटा इथे घेऊन जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. यावेळी हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. २०१३ साली केदारनाथ दुर्घटनेत बचावकार्य करताना हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरसह तीन हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातांमध्ये २३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

हे ही वाचा

येरवडा कारागृहातील कैदी जगात हुशार

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

नायजेरियात महापुराची तयारीच नसल्याने गमावले शेकडो जीव

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर

दरम्यान, शुक्रवार, २१ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार आहेत. तसेच, या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा