भारतीय नौदलाने मंगळवार, ६ जून रोजी कोचीनमध्ये स्वदेशी बनावटीच्या हेवी वेट टॉर्पेडोची यशस्वी चाचणी घेतली. या टॉरपीडोने पाण्याच्या आत लपलेल्या आपल्या लक्ष्याचा यशस्वी वेध घेतला. भारतीय नौदल आणि डीआरडीओच्या अंडरवॉटर डोमेनमधील सर्वोत्तम शस्त्र निर्मितीचा हा एक मैलाचा दगड आहे.
भारतीय नौदलाकडे वरुणास्त्र नामक हेवी वेट टॉर्पेडो आहे. त्याची चाचणी २०२२ मध्ये झाली होती. ते डीआरडीओने तयार केले आहे. त्याचे नाव महासागरांचे हिंदू देवता वरुणास्त्राने चालवलेल्या पौराणिक शस्त्राच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. नौदलाने चाचणी घेतलेल्या हेवी वेट टॉर्पेडोचे वजन १ हजार ५०० किलो असून लांबी ७- ८ मीटर आहे. वरुणास्त्र टॉर्पेडोची कार्यक्षम श्रेणी ४० किमी असून ते ४०० मीटर खोलवर जाऊन लक्ष्याचा वेध घेण्यास सक्षम आहे. याचा कमाल वेग ७४ किमी प्रति तास आहे.
हे ही वाचा:
दुर्गा देवीवरील अभद्र टिप्पणीबाबत उच्च न्यायालयाने कान उपटले
लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना अमेरिकेचे सडेतोड उत्तर
‘बिपरजॉय’मुळे पावसाची आणखी प्रतीक्षा
‘काँग्रेसने द्वेषाचा शॉपिंग मॉल उघडला आहे’
जीपीएस आधारित जगातील एकमेव टॉर्पेडो २५० किलो वजनाचे वॉर हेड वाहून नेऊ शकते. टॉर्पेडो जहाजे आणि पाणबुडी या दोन्हींमधून सोडले जाऊ शकतात. यापूर्वी भारतीय नौदलाने २३ मे रोजी आयएनएस मुरमुगाओ युद्धनौकेवरून एका नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे एक प्रगत क्षेपणास्त्र होते. त्याने समुद्रावर तरंगणाऱ्या आपल्या लक्ष्याचा अगदी खालून उडत जात यशस्वी वेध घेतला. या युद्धनौकेचे नाव पोर्ट सिटी गोव्यावर ठेवण्यात आले आहे.