कोकण किनारपट्टी, प. महाराष्ट्र, विदर्भात सरीवर सरी

मुंबईला पावसाने झोडपले २४ तास मुसळधार पाऊसाचा इशारा

कोकण किनारपट्टी, प. महाराष्ट्र, विदर्भात सरीवर सरी

मुंबई आणि उपनगरांना सकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढल्याचं दिसून येत आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला असला तरी साखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं नाही. पुढील २४ तास शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस व ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. कोकण किनारपट्टील, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये १२.९४ मिमी आणि १२.३३ मिमी पावसाची नोंद सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात झाली आहे. गेल्या २४ तासांत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या विभागात कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला असून कोठेही गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली नसल्याची माहिती राज्य आपत्ती विभागानं दिली आहे. मुंबईत अरबी समुद्रात ४.३९ मीटर उंचीच्या लाटा उसळतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज

भ्रष्टाचार, घराणेशाहीवर राहुल गांधींची बोलती बंद

पुलवामात दोन दहशतवाद्यांना टिपणाऱ्या देवेंद्र प्रताप सिंह यांना कीर्ती चक्र

वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ
१४ ते १५ ऑगस्ट या २४ तासांच्या कालावधीमध्ये गोंदिया जिल्हा तसेच मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात सरासरी १७३.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यानं तसेच वैनगंगा नदीची उपनदी असलेल्या बाघ नदीवरील शिरपूर व पुजारीटोला या धरणातून चालू असणाऱ्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोंदीया जिल्ह्यात पूर परिस्थती निर्माण झाली असल्याचे जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे.

Exit mobile version