गुजरातमध्ये शहरात पूर; चार बळी!

गाड्या, गॅस सिलिंडर वाहून गेले

गुजरातमध्ये शहरात पूर; चार बळी!

मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या १२ तासांत २४१ मिमी पाणी पाऊस पडल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून चार जण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. डझनभर गाड्याही पाण्याच वाहून गेल्या आहेत.गुजरातमधील दक्षिण आणि सौराष्ट्र भागांतील विविध जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार पाऊस पडला. परिणामी, धरणांची पातळी वाढल्याने आणि नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरी भागांसह दुर्गम गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

राज्यातील अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती. नवसारी आणि जुनागढला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. त्यमुळे अनेक निवासी आणि बाजारपेठ भागांत पाणी साचले होते. नागरिकांनी धरणे किंवा त्या परिसरात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.जुनागडमध्ये आठ तासांत २१९ मिमी पाऊस पडला. त्यामुळे पाणी साचल्याने रस्त्यावरील गाड्या आणि गुरेढोरे पाण्यात वाहून गेली. अनेक जण छातीपर्यंतच्या पाण्यातून चालत जात होती. अनेकांची स्वयंसेवकांनी मदत केली. सखल भागांत राहणाऱ्या नागरिकांना बचाव पथकांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.दक्षिण गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

हे ही वाचा:

अपघातातून सावरलेला ऋषभ पंत होतोय तंदुरुस्त

मणिपूरमध्ये नग्न महिलांची धिंड काढणाऱ्या पाचव्या आरोपीस अटक !

सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणजे नवीन पटनायक !

पाकिस्तानच्या सीमा हैदरला हवे भारतीय नागरिकत्व !

नवसारी शहरात नाल्यातून पिता आणि पुत्र वाहून गेल्याची घटना घडली. यातील पित्याला वाचवण्यात यश आले असले तरी अद्याप मुलाचा शोध लागलेला नाही. मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर नवसारी येथेही वाहतूककोंडी झाली होती. तर, दादरा नगर हवेली जिल्ह्यांतील सिल्वासाजवळ पिता-पुत्र बसलेली गाडी वाहून गेल्याची घटना घडली. देवभूमी, द्वारका, भागवनगर, भरूच, सुरत, तापी, वलसड आणि अमरेली भागांतही मुसळधार पाऊस झाला.भारतीय हवामान विभागाने दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र-कच्छ जिल्ह्यांतील अनेक भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, २२ जुलै ते २६ जुलै या कालावधीत उत्तर गुजरातमधील किनारपट्टीवर मच्छिमारांनी जाऊ नये, असा सल्लाही दिला आहे.

Exit mobile version