मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी

गेल्या महिन्यापासून गायब असलेल्या पावसाने आज मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईच्या इस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर दृष्यमानता कमी झाली आहे. येत्या तीन ते चार तासात मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तुफान पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे.

दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा ठाण्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र या भागात कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही. सद्या तरी सखोल भागात पाणी साचले नसले तरी पावसाचा जोर जर वाढला तर सखल भागात पाणी साचू शकते. तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हे ही वाचा:

…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

बनावट तिकीट तपासनीसांचीच झाली तपासणी

आता श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराची प्रतीक्षा

पालघर जिल्ह्यात पहाटे पासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तर काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. बोर्डी, डहाणू, चिंचणी, मुरबे, सातपाटी, सफाळे, पालघर या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर पूर्व पाट्यातील बोईसर, मनोर, कासा, चारोटी भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचे पाणी भरल्याने बोर्डी उंबरगाव रस्ता बंद झाला आहे. डहाणू, घोलवड, बोर्डी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गुजरात राज्यातील उंबरगावातही सखोल भागात पाणी साचले आहे. भातशेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया बळीराजाकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version