जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली

कोकण पट्टा, हिंगोली, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर

जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली

हवामान खात्याने चार- पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याचे चित्र आहे. कोकण पट्टा, हिंगोली, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर या भागांमध्ये पावसाने जोर धरला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून याचा परिणाम म्हणून पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होत आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे पूर सदुश्य स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. पुढेच चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना अलर्ट देण्यात आला आहे.

रायगडमध्येही पावसाचा जोर असून अंबा नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पाली- खोपोली मार्ग बंद झाला आहे. चिपळूण शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून वशिष्ठी नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून एनडीआरएफचे पथक दखल झाले आहे. खेडमध्येही जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

हे ही वाचा:

देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यात दोन जणांना घेतलं ताब्यात

किरीट सोमय्या व्हीडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई सुरू

भारत सर्वाधिक पाच जीडीपी असणाऱ्या देशांच्या पंक्तीत

किरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग…

पुण्यासह पालघर, सातारा आणि रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली असून याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

Exit mobile version