परतीच्या मुसळधार पावसाने पुणे शहराला काल चांगलंच झोडपून काढले. शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र होते. तसेच रस्त्यांवरही वाहतूक कोडी मोठ्या प्रमाणवर पाहायला मिळत होती. पहाटेपासून पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी अनेक भागांमध्ये पाणी तसेच साचले आहे.
पुणे- सोलापूर हायवेवर मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे हायवेवरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. पुणे सोलापूर हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ मंदिरासह पुणे स्टेशनमध्येही पाणी शिरलं होतं. पुण्यातील पावसाचा फटका महालक्ष्मी एक्सप्रेसला देखील बसला. त्यामुळे प्रवाशांना फलाटावरचं उभं राहण्याची वेळ आली होती. स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी साचलं होते.
हडपसर- मांजरी परिसरात ढगांच्या गडगडाटासह सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. साडेसतरानळीच्या ठाणगे वस्तीत काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. बिबवेवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला स्वामी विवेकानंद मार्गाला नदीचे स्वरुप आले होते.
हे ही वाचा
आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका
नायजेरियात महापुराची तयारीच नसल्याने गमावले शेकडो जीव
सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर
बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ‘या’ आमदराकडून अंधेरी पोट निवडणुक बिनविरोध करण्याची मागणी
तसेच मुसळधार पावसामुळे शहरातील बहुंताश रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणे अवघड झाले होते. अनेक दुचाकी, रिक्षा यावेळी पाणी गेल्याने बंद पडल्या होत्या. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या होत्या.