22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषमुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी

मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी

Google News Follow

Related

मुंबईसह उपनगरांत पावसाने गुरुवार, ३० जूनपासून जोरदार हजेरी लावत आजही मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. हवामान खात्याकडून (Weather Department IMD) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने केलेले नालेसफाईचे सगळे दावे या एक दिवसाच्या पावसाने फोल ठरवल्याच चित्र आहे.

पहिल्याचं मुसळधार पावसामुळे गुरुवारी अनेक सखल भागात पाणी साचल्याचं चित्र होतं. तर पावसाचा परिणाम उपनगरीय रेल्वेवरही दिसून आला. हिंदमाता, परेल, हाजी अली, डॉकयार्ड रोड, गांधी मार्केट आणि वांद्रे या भागात अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक मंदावली होती. काळबादेवी आणि सायन भागात इमारत कोसळण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत आज ईडीसमोर हजर होणार

सेटलवाड अटकेविरोधातील आंदोलनात कॅथलिक समाजाला ओढले जात आहे!

मिलिंद घाग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष

आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शहरात ११९.०९ मिमी, पश्चिम उपनगरांत ७८.६९ मिमी आणि पूर्व उपनगरांत ५८.४० मिमी पाऊस झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा