राज्यात पावसाचे आगमन झाले असून मुंबईमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध शहरांमध्ये पाऊस पडत होता. अखेर पावसाने मुंबईत आगमन केले असून मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पाऊस सुरु झाला आहे. हवामान खात्याने यलो अलर्टही जारी केला आहे. त्याचप्रमाणे विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईतील उपनगरांसह कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात जोरदार पाऊस होत आहे. पुढच्या चार ते सहा तासांत या भागांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उपनगरातील बोरिवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव परिसरात पावसाचा अधिक जोर दिसून येत आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असूनयाचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या भागांत पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा..
दिल्ली अबकारी प्रकरणात १०० कोटी रुपयांची मागितली लाच!
व्हॉट्सअप स्टेटसवर गोहत्येचे छायाचित्र लावल्यानंतर संतप्त हिंदूंची निदर्शने!
दिल्लीत ४८ तासांत उष्णतेमुळे ५० बेघर लोकांचा मृत्यू
मक्कामध्ये उष्णतेची तीव्र लाट; भारतातील ९० यात्रेकरूंचा मृत्यू!
ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. १०० मिमी पााऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.