दहीहंडीच्या दिवशी ढगांचे थर आणि वर्षोल्हास

मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाची हजेरी

दहीहंडीच्या दिवशी ढगांचे थर आणि वर्षोल्हास

जुलै महिन्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती त्यानंतर राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर बळीराजासमोर शेतीकामे मार्गी लावण्याचा भीषण प्रश्न उभा राहिला होता. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळपासून मुंबई, पुणेसह राज्याच्या अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यात पावसाचे पुनरागमन होईल असा इशारा दिला होता. या दिलेल्या अंदाजानुसार राज्यात बहुतांश भागात गुरुवार सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पावसाने हजेरी लावली असून उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक सुखावले आहे. तसेच मुंबईत दहीहंडीचा जल्लोष सुरू असून पावसाच्या आगमनामुळे गोविंदा खुश झाले आहेत.

मुंबईच्या सायन आणि दादर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. तर, मुंबईच्या अनेक उपगनर भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत अनेक ठिकाणची वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे. पालघर मध्ये तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे.

नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील इतर जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली असून विदर्भात पुढील तीन दिवस यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला

Exit mobile version