गुजरातमध्ये अभूतपूर्व असा पाऊस कोसळत असून विविध जिल्ह्यांमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. २४ तास अखंड वृष्टी होत असून त्यात ६४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुसळधार पावसामुळे दहा हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. गुजरातमधील ८ जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुजरातमध्ये येणाऱ्या पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधील छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी, पंचमहाल या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. अहमदाबाद, नवसारी, नडियाद आदी शहरांमध्ये अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.
Gujarat | Heavy rainfall results in severe water logging and flood-like situation in Ahmedabad (11.07) pic.twitter.com/hzENXGv0Zl
— ANI (@ANI) July 11, 2022
गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पावसामुळे १० हजार ७०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील पुराबद्दल ट्वीट केलं असून ते म्हणाले की, गुजरातच्या विविध भागांत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीच्या संदर्भात मी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी बोललो आहे. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन यावेळी अमित शहा यांनी ट्विटरद्वारे दिलं आहे. गुजरात प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ लोकांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत, असंही शहा यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
हे ही वाचा:
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्बफेक
एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे
खासदारांच्या दबावानंतर भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठींबा
सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स; २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
गुजरातसह, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातही मुसळधार पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे. हवामान खात्याकडून मंगळवार, १२ जुलै रोजी म्हणजेच आज उत्तराखंड आणि केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेश सागर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यावेळी वीज कोसळून तीन मजूर ठार झाले आहेत.