राजस्थानमध्ये यंदाच्या मे महिन्यात विक्रमी ६२.४ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस राजस्थानमधील मे महिन्यात पडलेला गेल्या १०० वर्षांतला सर्वाधिक पाऊस आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये मे महिन्यात सरासरी १३.६ मिमी. पाऊस पडतो. मात्र यंदा हवामानातील विविध बदलांमुळे रिमझिम ते मुसळधार पावसाच्या घटना घडल्या. त्यानुसार, मे महिन्यात विक्रमी ६२.४ मिमी. पावसाची नोंद झाली. जी गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९१७मध्ये ७१.९ मिमी. पावसाची नोंद झाली होती.
हे ही वाचा:
साक्षीच्या हत्येत वापरलेला चाकू सापडला; साक्षीच्या शरीरावर ३४ जखमा
डी – मार्ट मॅनेजरने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट
इतिहासातील इतर नायकांपेक्षा छत्रपती शिवराय अद्भूत!
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पश्चिम राजस्थानच्या काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली. तर, पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी ढगांचा गडगडाट, वीज चमकणे, तसेज जोरदार वाऱ्यासह कमी-अधिक पावसाची नोंद झाली.
६ जूनपर्यंत वादळ-पावसाची शक्यता
जयपूर हवामान केंद्राचे प्रभारी राधेश्याम शर्मा यांनी सांगितले की, ३ आणि ४ जून रोजी पुन्हा वादळवाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. तसेच, बिकानेर, जयपूर, अजमेर आणि भरतपूर संभागमधील जिल्ह्यात ढगांचा गडगडाट, वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यस्थानचा पश्चिम भाग, उत्तर आणि पूर्व भागांमध्ये ५ ते ६ जूनपर्यंत पाऊस आणि वादळाची शक्यता असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. त्यानंतर ७ ते ८ जूननंतर वादळ आणि पाऊस कमी झाल्यानंतर तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते.