मुंबई ठाण्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई ठाण्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज

आज सकाळपासूनच नवी मुंबई, ठाण्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. जोरदार पावसामुळे नवी मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. सकाळपासूनच पावसाने संततधार लावून धरल्याने रहिवाशांना बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.

गेल्या आठदिवसांपासून ठाणे, नवी मुंबईत पावसाने संततधार लावली आहे. आज सकाळपासून नवी मुंबईत पावसाने जोर धरला. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे येथील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं होतं. दुपार झाली तरी नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू होता.

ठाण्यातही काल मध्यरात्रीपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कल्याण नजीक असलेल्या अंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. भिवंडी शहर व तालुक्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाची जोरदार सर तर रिमझिम संततधार सुरू आहे.

हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार, सलग ३ ते ४ दिवस मुंबई, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाले आहे. येत्या २४ तासात त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात सद्या तरी ढगाळ वातावरण असून वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे

देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, केरळमध्ये मात्र भयावह स्थिती

शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?

ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा सामना करावा लागला आहे. खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्यांमध्येही खड्डे आणि चिखल झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर ७ ते ८ किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या खड्ड्यांमधूनच वाट काढावी लागत असल्याने प्रवाशांची प्रचंड हालत झाली आहे. गेल्या तासाभरांपासून प्रवाशांना खड्ड्यात अडकून पडावेल लागले आहेत. वाहतुकीची कोंडी, पावसाची संततधार आणि रस्त्यावरील खड्डे आणि चिखल यामुळे प्रवाशांना गाडीतच अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड चिडचिड झाली आहेत.

Exit mobile version