25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषमुंबईत पावसाचे थैमान, मुंबईसह पालघर, ठाण्याला फटका

मुंबईत पावसाचे थैमान, मुंबईसह पालघर, ठाण्याला फटका

रेल्वे थांबल्या, दुर्घटनाही घडल्या

Google News Follow

Related

मुंबईत बुधवारी पावसाने थैमान घातले. ठाणे, पालघर, रायगड, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पावसाची संततधार होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लोकल ट्रेनवर याचा परिणाम झाला.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान पाहायला मिळाले. काही दुर्घटनाही यानिमित्ताने घडल्या. जोगेश्वरी येथे एक महिला मॅनहोलमध्ये पडली. तिचा शोध सुरू करण्यात आला होता. जोगेश्वरीच्या सिप्झजवळ ही घटना घडली. कल्याण तालुक्यात खदाणीत काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून याचा आता तपास सुरू आहे.

संततधार पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वेला फटका बसला. कुर्ला, सायन येथे पाणी भरल्यामुळे रेल्वेगाड्या थांबल्या. गाड्या थांबल्यामुळे अनेकांना ट्रॅकवर उतरून चालावे लागले तर काही लोकांनी बसेस पकडून निर्धारित स्थळी जाण्याचे ठरविले.

ठाणे रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांना जवळपास दोन तास रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे अडकून पडावे लागले. कोणत्याही घोषणा होत नसल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. पावसामुळे दुसऱ्या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात आली. पावसामुळे पाणी भरल्याच्या घटनाही घडल्या. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनीही या सगळ्या परिस्थितीची पाहणी केली.

हे ही वाचा:

उमराह व्हिसाच्या नावाखाली भिकाऱ्यांना पाठवणे थांबवा, सौदी अरेबियाचा पाकिस्तानला इशारा!

भारतातील निवडणूक प्रक्रिया जाणून घेण्यासाठी १५ देशांचे राजदूत पोहचले जम्मू- काश्मीरमध्ये

पंतप्रधानांची फेसबुकवर पोस्ट शेअर केल्याने कट्टरपंथीयांकडून तिघांचे अपहरण करत मारहाण!

ज्या भ्रष्ट व्यक्तीला तुरुंगात टाकले त्या व्यक्तीची तुलना प्रभू श्री रामांशी होते हे अमान्य

मुंबईप्रमाणेच राज्यातील विविध जिल्ह्यातही पावसाचा फटका बसला. मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. विदर्भातील अनेक भागात प्रचंड पाऊस झाला. नांदेड लातूरमधील पावसामुळे लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. सांगली मिरजमध्येही पावसाने चांगलेच झोडपून काढले. मिरज तालुक्यातील ताणंग येथे पावसाच्या पाण्यामुळे ओढापात्रात एक वृद्ध वाहून गेला. पूल ओलांडताना त्याचा तोल गेला. पण नंतर एका झाडाला त्याने पकडले. अड़ीच तास तिथे अडकल्यावर त्या वृद्ध व्यक्तीला वाचविण्यात यश आले.

वसई विरार नालासोप-यात मागच्या दीड तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वसईतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वसई पश्चिम अंबाडी रोड, शंभरफुटी रोड, सिक्सिफिट रोड, दिवानमान, समता नगर, चुळणे, वसई पूर्व एवर्षाइन, नवजीवन, वालीव, सातीवली, नालासोपारा पूर्व चंदन नाका, आचोला रोड, नागिनादास पाडा, विजय नगर, नालासोपारा पश्चिम श्रीप्रस्थ, पाटणकरपार्क, विरार पश्चिम विवा कॉलेज रोड, जकात नका, विरार पूर्व विवा जांगिड परिसरात पाणी साचले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा