27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषमराठवाड्यात पूर, ५०-६० गावांचा नांदेडशी संपर्क तुटला !

मराठवाड्यात पूर, ५०-६० गावांचा नांदेडशी संपर्क तुटला !

एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरु

Google News Follow

Related

काही दिवस पाठ फिरविलेल्या पावसाने राज्यात पुन्हा जोर धरला आहे. मराठवाड्याला याचा मोठा फटका बसला आहे. दोन दिवस सलग पाऊस पडत असल्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांची अनेक जनावरे सुद्धा वाहून गेली आहेत. पाण्यामुळे घरात अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न एनडीआरएफचे पथक करत आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने गेल्या २४ तासांपासून हिंगोलीसह परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे, अजूनही जोरदार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आला असून, शेतकरी, नागरिकांनी पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

हे ही वाचा :

कन्नौज बलात्कार प्रकरण: सपा नेता नवाब सिंह यादवचा डीएनए सॅम्पल झाला मॅच!

जम्मूत लष्करी तळावर हल्ला

मैतई-कुकी गटात पुन्हा गोळीबार, महिलेचा मृत्यू !

‘IC814- द कंदहार हायजॅक’ वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपविली?

गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील आसना नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जवळपास ५०-६० गावांचा नांदेडशी असलेला संपर्क तुटलेला आहे. नदीचे पात्र भरून वाहू लागले आहेत, गावागावात पाणी साचेल आहे, जनावरे देखील पाण्यात अडकलेल्या स्वरुपात आहेत, वाहूनही गेली आहेत. याचे व्हिडीओ-फोटो समोर आले आहेत. एनडीआरएफ पथकाचे बचावकार्य सुरु आहे.

कळमनुरीमधील देवजना गावातील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे हे लोक काल (१ सप्टेंबर) अडकून पडले होते. आज एनडीआरएफ पथकाने बचाव मोहीम राबवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा