हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिले आणि त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या चांगलेस ट्रोल झाले. त्यानंतर आता हार्दिक पंड्याच्या दुखापतीचे अपडेट्स समोर आले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का लागला आहे. हार्दिक पंड्या अफगाणिस्तानच्या टी-२० मालिकेत खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या बातमीमुळे हार्दिक आता आयपीएलसाठी तरी फिट होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. आयपीएलसाठी हार्दिक फिट होऊ शकत नसल्याचे काही जणांना वाटत आहे. त्यामुळे हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का बसणार यात काडीमात्र शंका नाही.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधारपद बहाल केले. त्यानंतर मुंबईच्या चाहत्यांचा रोष ओढवून घ्यावा लागला. गेले काही दिवस चाहते मुंबई इंडियन्सला ट्रोल करतानाचे चित्र आहे. हार्दिक हा भारताच्या टी-२० कर्णधार आहे, त्यामुळे त्याला मुंबईने आपल्या संघाचे कर्णधारपद दिल्याचे म्हटले जात होते. आता हार्दिक पंड्याच फिट नसल्याने त्यांच्यासमोर हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा :
राहुल गांधींनी विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेत फलक आणण्यास प्रवृत्त केले
खलिस्तान समर्थकांकडून अमेरिकेतील हिंदू मंदिरावर मोदींविरोधात लिहिला आक्षेपार्ह मजकूर
भारतीय प्रवाशांनी भरलेल्या विमानाला फ्रान्सने रोखले
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा मुहूर्त
वनडे वर्ल्डकपच्या खेळत असलेल्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यानंतर हार्दिक एकही सामना खेळलेला नाही. त्यानंतर हार्दिकच्या जागी भारतीय संघात मोहम्मद शमीला संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलियाबरोबर पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. त्यावेळेसही हार्दिक फिट नव्हता. सूर्यकुमार यादवला संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावेळी तोच कर्णधार होता. त्यानंतर आता जानेवारी महिन्यात तो फिट होईल आणि टी-२० मालिका खेळेल, असे सर्वांना वाटत होते. पण हार्दिक अजूनही फिट नसल्याने ही मालिका खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पण सर्वात मोठी बातमी म्हणजे हार्दिक आयपीएलसाठी तरी फिट होणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का असेल.