केंद्र सरकारने ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून परदेशातून लसी मागवाव्या, लसींचा तुटवडा होऊ देऊ नका, असे सल्ले उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांनी दिले असले तरी परदेशातील लसींचे दुष्परिणाम काय हे लक्षात आल्यानंतर त्यांना आपलेच हे शब्द गिळावे लागतील. फायझर, मॉडर्ना या लसींमुळे अमेरिकेतील तरुणांमध्ये हृदयविकाराचा आजार आढळल्याचे आता समोर येऊ लागले आहे. अस्ट्रोझेन्कानंतर फायझर, मॉडर्ना या लसींचे डोस घेतल्यानंतर अमेरिकेतील काही लोकांमध्ये हृदयविकार बळावल्याचे दिसून आले आहे.
आतापर्यंत २७५ लस घेतलेल्यांना असा त्रास झाल्याचे आढळले आहे. हृदयातील पेशींना सूज येणे (मायोकार्डायटिस) आणि हृदयाच्या आसपासच्या पेशींना सूज येणे (पेरिकार्डायटिस) असे दोष या लसींमुळे आढळल्याचे समोर येते आहे. पहिल्या डोसनंतर २१६ जणांमध्ये मायोकार्डायटिस तर दुसऱ्य़ा डोसनंतर ५७३ जणांना हे दोन्ही त्रास झाल्याचे दिसले आहे. यात पुरुषांची संख्या जास्त आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी खेळतंय
शिरोडकर स्पोर्टसचे संस्थापक बापू खरमाळे काळाच्या पडद्याआड
प्रतिज्ञापत्र सादर करा! सरकारच्या शुल्क नियंत्रण समितीला कोर्टाचा आदेश
कर्नाळा बँक घोटाळा; माजी आमदार विवेक पाटील अटकेत
सेंटर फॉर डिसिज कंट्रोल (रोग नियंत्रण केंद्र) च्या मते या लसींचा वापर करण्यापूर्वी त्यांच्या चाचण्यांच्या निष्कर्षांचा सखोल अभ्यास करण्याची गरज होती. हा त्रास फायझर लसींचा वापर केल्यावर सर्वाधिक असल्याचेही समोर आले आहे. अशा ८०० प्रकरणांचा तपास ही डिसिज कंट्रोल यंत्रणा करत आहे.
मागे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी फायझर लसी अमेरिकेतून लवकरात लवकर खरेदी करा, अशी मागणी केली होती. भारतातील लसींवर विश्वास नसल्याचे केंद्र सरकारविरोधात रोज उठून शंखनाद करणाऱ्या अनेक राजकारण्यांनी जाहिररित्या म्हटलेले आहे. भारतातील कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी मात्र विश्वासपात्र असल्याचे दिसून आले आहे. त्याची स्तुती मात्र करताना ही मंडळी कधी दिसलेली नाहीत. आता अमेरिकेतील या लसींचे दुष्परिणाम दिसून येत असतील तर याच विरोधकांची मते काय आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.