देशभरांत अचानक हृदय विकाराच्या मृत्यूमुळे अनेक रुग्ण दगावल्याचे समोर येत असून याचा कोरोनाशी संबंध असू शकतो, असे मत एम्स रुग्णालयाचे कार्डिओलॉजि विभागाचे प्राध्यापक डॉक्टर राकेश यादव यांनी व्यक्त केले आहे.
सध्या या रुग्णांची आकडेवारी उपलब्ध नसून कोरोनाशी याचा संबंध नक्कीच असल्याचे ते म्हणाले. २०२० साली डॉ. यादव यांचा या विषयासंबंधित एक लेख इंडियन हार्ट जर्नल मध्ये प्रकाशित झाला होता. त्यांत त्यांनी या घटकांचा उल्लेख केला होता.
हे ही वाचा: ९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश
सर्कसचा तंबू गुंडाळण्याच्या मार्गावर
साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’
कर्जमाफीचे आश्वासन पाळा म्हणत काँग्रेसच्या पदयात्रेत शेतकऱ्यांचे आंदोलन
संक्रमणाचा इतिहास आणि हृदय विकाराचा वाढता धोका याचा संबंध त्यांनी अधोरेखित केला आहे. डॉक्टर पुढे असेही म्हणतात कि, वयाच्या किंवा तब्ब्येतीच्या आधारावर हृदय विकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. नागरिकांनी हृदय विकार टाळण्यासाठी वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.
याशिवाय एम्स रुग्णालयांतील फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजिचे प्राध्यापक डॉक्टर सुधीर गुप्ता यांचे असे म्हणणे आहे की, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार किंवा इतर जोखमीच्या घटकांमुळे हृदय विकारांमुळे मृत्यू झालेल्या तरुण रुग्णांचे पोस्टमार्टेम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल असेही डॉक्टर गुप्ता म्हणाले.