दिशा सालीयानचे वडील सतीश सालीयान यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रीट याचिकेची सुनावणी २ एप्रिल रोजी होणार आहे. सालीयान यांच्यातर्फे काम पाहणाऱ्या वकिलांनी या याचिकेची प्रत समीर वानखेडे यांना सुपूर्द केली आहे.
याबद्दल अॅड. फैजान मर्चंट यांनी सांगितले की, त्यांचे अशील उच्च न्यायालयात एक सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. त्यात त्यांच्या संदर्भातील सर्व मुद्द्यांची उत्तरे दिली जातील. कायदेशीर प्रक्रियेच्या एक भाग म्हणून, समीर वानखेडे यांनी त्यांच्या अधिकृत चौकशीत जमा केलेले महत्त्वाचे पुरावे – विशेषतः रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित – न्यायालयासमोर सादर करणे अपेक्षित आहे.
हेही वाचा..
नायजरमधील जिहादी संघटनेने एका गावाला केले लक्ष्य, ४४ जणांचा मृत्यू!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली
चंदीगडमध्ये हल्ला झालेला ग्रेनेड ‘पाकिस्तानी’
दक्षिण कोरियातील २० हून अधिक जंगलांमध्ये आग!
अनधिकृत सूत्रांनी सांगितले की, समीर वानखेडे यांचे प्रतिज्ञापत्र आधीच तयार असून याचिकेची प्रत माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यानंतर त्यातील गंभीर माहिती उघड होण्याची शक्यता आहे, जी अनेक व्यक्तींना गुन्हेगारी प्रकरणात अडचणीत आणू शकते.