उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये रेल्वे रुळावर ‘मातीचा ढीग’

लोको पायलटच्या सतर्कतेने अपघात टळला

उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये रेल्वे रुळावर ‘मातीचा ढीग’

रेल्वे रुळावर अनेक प्रकारच्या वस्तू ठेवून ट्रेन उलटवण्याच्या कटाच्या बातम्या अधून-मधून समोर येत आहेत. अशा घटनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोको पायलट, रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने आतापर्यंत कोणतीही दुर्घटना घडली नाही. याच दरम्यान, उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये रेल्वे रुळावर मातीचा ढीग टाकल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायबरेली येथील रघुराज सिंह स्टेशनजवळ रविवार आणि सोमवार (६-७ ऑक्टोबर) मध्यरात्री ही घटना घडली. लोको पायलटच्या निदर्शामुळे मोठा अपघात टळला. लोको पायलटकडून सूचना मिळाल्यानंतर रुळावरील माती हटवण्यात आली आणि या मार्गावर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा : 

आप खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीचा छापा!

चेन्नईमध्ये एअर शो बघायला लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू

चिनी नागरिकांना लक्ष्य करून कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आत्मघाती हल्ला

दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ – शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी!

या घटनेबाबत बोलताना रायबरेली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे ट्रॅकवर मातीचा एक छोटा ढीग टाकण्यात आला होता, त्यामुळे रायबरेलीहून येणारी शटल ट्रेन थांबवण्यात आली होती. या प्रकरणी तपासणी केली असता स्थानिकांनी सांगितले, या भागात रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने रात्रीच्या वेळी डंपरने मातीची वाहतूक केली जाते. दरम्यान, जाणून-बुजून रेल्वे ट्रॅकवर माती टाकल्याचे काहीजण बोलत आहेत, तर रेल्वे रुळावरून पलीकडे जाण्यासाठी रस्त्याचा भाग खालवर असल्याचे कदाचित डंपरमधून माती रेल्वेरुरुळावर पडली असावी, असेही काही अंदाज लावत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version