यंदाही ‘आभाळमाया’

यंदाही ‘आभाळमाया’

हवामानखात्याकडून सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता

देशभरातील वाढता कोविड, रुग्णालये, रेमडेसिवीर यासारख्या प्रश्नांच्या सावटामध्ये भारतीय जनतेसाठी दिलासा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचा नैऋत्य मौसमी वाऱ्यांमार्फत येणारा मान्सून सरासरीच्या ९८% होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या एकूण पर्जन्यमानापैकी ७०% ते ७५% पाऊस नैऋत्य मान्सून मार्फत मिळतो.

भारतीय शेतीसाठी सशक्त मान्सून अत्यावश्यक आहे. भारताच्या शेतीपैकी सुमारे ५०% शेती ही कोरडवाहू शेती आहे. भारताच्या एकूण शेती क्षेत्रापैकी सुमारे अर्ध्या क्षेत्राला या नैऋत्य मौसमी पावसाद्वारे पाणी मिळते. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २१% वाटा हा शेतीचा आहे, तर एकूण रोजगारापैकी शेतीचा वाटा ६०% आहे. त्यामुळे एकूणच भारतीय कृषी क्षेत्रासाठी नैऋत्य मौसमी मान्सून सशक्त असणे फायद्याचे ठरते.

हे ही वाचा:

दिल्लीच्या नायाब राज्यपालांकडून हेल्पडेस्कची निर्मीती करण्याचे निर्देश

जिलेटिनची कांडी आणि ऑक्सिजनची नळकांडी

बीडमध्ये कोरोनाचा हाहाकार, सत्ताधारी मात्र गायब

उत्तर प्रदेशातही दर रविवारी टाळेबंदी

चार महिन्यांच्या पावसाच्या कालावधीत फक्त पीकांसाठी नाही तर इतर सर्वच वापराठी पाणी उपलब्ध होते. पावसाचे पाणी, हा पाण्याचा एकमेवस स्रोत असल्याने मान्सून दुबळा झाल्यास पाणी टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. ज्यावेळेला गेल्या ५० वर्षातील पर्जन्यमानाच्या सरासरीच्या ९६% ते १०४% पाऊस पडतो, तेव्हा सामान्य मान्सून समजला जातो. यंदा ही शक्यता ९८% वर्तवली जात आहे.

Exit mobile version