कोरोनाशी लढायचे आहे? मग व्यायाम करा!

कोरोनाशी लढायचे आहे? मग व्यायाम करा!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यामध्ये नियमित व्यायाम, सकस अन्नाचे सेवन, पुरेशी झोप आणि वजनावरील नियंत्रण या सर्वांचा समावेश होतो.

अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते नियमित व्यायम करणाऱ्या आणि सकस अन्नाचे सेवन करणाऱ्या लोकांची प्रतिकारक्षमता चांगली असते. त्यामुळे अशा महामारीच्या काळात ते आजारांचा सामना यशस्वीपणे करू शकतात. त्याच्या उलट मधुमेह, हृदयरोग असे आजार झालेल्या लोकांना कोविड सारख्या काळात अधिक धोका संभवतो. परंतु या सर्वांमध्ये डॉक्टरांनी लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींबाबत विशेष चिंता व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

पुण्यात आणखी ‘कडक निर्बंध’

वाझे आणि काझीच्या कोठडीत वाढ

जोधा अकबराचा सेट भस्मसात

‘विरूष्का’कडून कोरोनाबाधितांना दोन कोटींची मदत

लठ्ठपणा असलेल्या लोकांना कोविड काळात विशेष खबरदारी घेण्याची गरज असते. कारण लठ्ठपणा श्वसनामध्ये अडथळे निर्माण करणारा ठरू शकतो. ज्यावेळेस शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते, त्यावेळेत पोटावर झोपवल्यास रुग्णाला सहाय्य होऊ शकते. परंतु लठ्ठ व्यक्तींना पोटावर झोपवणे शक्य नसते. त्यांच्या पोटाचे वजनच त्या पद्धतीत रुग्णाला त्रासदायक ठरू शकते.

फोर्टिस रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर रवि शेखर झा यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या लाटेत अनेक लठ्ठपणा असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत, आणि या वेळेस आजाराची घातकता वाढली असल्याने त्यांना हाताळणे हे आव्हानात्मक झाले आहे.

यावेळेस त्यांनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले की निरोगी जीवनशैली व्यक्तीच्या SARS-CoV-2 सारख्या आजाराशी सामना करण्याच्या क्षमता वाढवते. मधुमेह, हृदरोग, लठ्ठपणा यांसारखे जीवनशैलीशी निगडीत आजार कोविड काळात रुग्णालयात दाखल होण्याच्या शक्यता तर वाढवतातच, त्याशिवाय अशा रुग्णांचा मृत्यु होण्याची शक्यता देखील बळावते.

चांगला बॉडी मास इंडेक्स ठेवणे, नियमित व्यायम करणे आणि संतुलित, सकस आहार घेणे हे या महामारीत प्रत्येकाच्या आयुष्यात असलेच पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले.

Exit mobile version