नांदेडमध्ये प्रसादातून ९० जणांना विषबाधा!

पोलिसांकडून तपास सुरु

नांदेडमध्ये प्रसादातून ९० जणांना विषबाधा!

नांदेडमध्ये जवळपास ९० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.मंदिरात दिलेल्या प्रसादाचे सेवन केल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.सर्वांना रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी(१५ मे) संध्याकाळच्या वेळेस घडली.परिसरातील शिवमंदिराबाहेर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भक्तांना प्रसाद देण्यात आल्यानंतर अनेकांना याचा त्रास होऊ लागला.

पोलिसांनी पुढे सांगितले की, भाविकांना प्रसाद म्हणून ‘आंबील'(पेय) आणि ‘खीर’ (दुधापासून बनवलेला गोड पदार्थ) देण्यात आले होते. मात्र, आंबीलचे सेवन केल्यानंतर भाविकांना चक्कर येऊन उलट्या होऊ लागल्या.सुरुवातीला काहींना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सायंकाळी या संख्येत वाढ झाली.पोलिसांनी सांगितले की, जवळपास ९० जणांना उपचाराकरिता विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

‘भावेश भिंडेकडून ‘मातोश्री’ला किती मलिदा मिळाला? एसआयटी चौकशी करा’

चिमुकल्या मोदी, योगींची हवा, पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवले

शिंदेंच्या बॅगांची तपासणी झाली आता ठाकरेंच्या फार्म हाऊसची होऊ द्या!

स्वाती मालीवाल हल्ल्याच्या आरोपावर केजरीवालांनी प्रश्न टाळला

दरम्यान, या सर्वांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.तसेच घटनेची दखल घेत पोलीस पथक घटनास्थळी भेट दिली आणि तपस सुरु केला आहे.या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version