केंद्र आरोग्य मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखू विरोधी सूचनासाठी नवीन नियमावलीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मला तंबाखू विरोधी सूचना दाखवणे बंधनकारक असेल. जर कोणता प्लॅटफॉर्म नियमांचे पालन करत नसल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
मंत्रालयाने सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा, २००४ अंतर्गत सुधारित नियम अधिसूचित केले. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम, २०२२ अंतर्गत या दुरुस्ती नियमांनुसार ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशारे दर्शविणे अनिवार्य केले आहे. नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्मसाठी ओव्हर द टॉप कंटेंटच्या निर्मात्यांना, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी किमान ३० सेकंदात तंबाखूविरोधी आरोग्य स्पॉट्स दाखवणे अनिवार्य असेल.
कार्यक्रमादरम्यान तंबाखू उत्पादने किंवा त्यांचा वापर प्रदर्शित केल्यावर स्क्रीनच्या तळाशी एक प्रमुख स्थिर संदेश म्हणून त्यांना तंबाखूविरोधी आरोग्य सूचना प्रदर्शित करणे देखील आवश्यक आहे.तसेच किमान २० सेकंदांचा ऑडिओ-व्हिज्युअल डिस्क्लेमर देखील प्रदर्शित करणे आवश्यक आहे. हा डिस्क्लेमर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी प्रदर्शित केला जाईल, अशी माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
हे ही वाचा:
पाद्री, मौलवींचे गणवेश, मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर भुजबळ टीका करतील का?
राहुल गांधींनी नरेंद्र मोदी, भाजपाबद्दलचे दुखणे अमेरिकेत सांगितले
२६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्युमुखी
एका अधिकाऱ्याने सांगितले की, तंबाखूच्या सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यूचे प्रमाण चांगलेच स्थापित झाले आहे. तंबाखूच्या सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिराती काढून टाकून तंबाखूच्या वापराला परावृत्त करण्यासाठी सरकारने सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीवर बंदी आणि व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरणाचे नियमन) नियम, २००४, (COTPA) लागू केले आहे. लोक तंबाखू सेवनापासून दूर कसे राहतील तसेच तंबाखू सेवनाने कोण कोणते आजार होतात याचे मार्गदर्शन करण्याचे काम सरकार वेगवेगळ्या अभियानातून करताना दिसते.
सध्या सोशल मीडियाचे बघण्याचे वाढते प्रमाण फेसबुक, यू,ट्यूब, असे इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर धूम्रपान, मद्यपान दाखवण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसले, मात्र आरोग्यास हानिकारक असल्याच्या सूचनेचा वापर आतापर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्म करत नसल्याचे आढळून आले.अशा दृशांमुळे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन धूम्रपान, मद्यपेयचे प्रमाण वाढत असल्याने सरकारकडून ही नियमावली जारी करण्यात आली आहे.