औषध कंपन्यांना मोठा झटका; सर्दी, ताप, वेदनांवर आराम देणाऱ्या १५६ औषधांवर बंदी !

मानवाच्या शरीराला हानिकारक असल्याने केंद्र सरकारचा निर्णय

औषध कंपन्यांना मोठा झटका; सर्दी, ताप, वेदनांवर आराम देणाऱ्या १५६ औषधांवर बंदी !

सर्दी, ताप आणि अंगदुखीवर वापरल्या जाणाऱ्या १५६ हून अधिक औषधांवर आरोग्य मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. या संयुक्त औषधांचा वापर सातत्याने पेनकिलर म्हणजे अंगदुखी कमी करण्यासाठी करण्यात येतो. ही  औषधे नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये पॅरासिटामोल, ट्रामाडोल, टॉरिन आणि कॅफीन यांच्या संयुक्त औषधांवर बंदी आणली आहे. यासह एसिक्लोफेनाक ५०एमजी + पॅरासिटामोल १२५एमजी कॉम्बिनेशन, मेफेनामिक ॲसिड + पॅरासिटामोल इंजिक्शेन, सेट्रीजीन एचसीएल + पॅरासिटामोल + फेनिलफ्रीन एचसीएल, लेवोसेट्रीजीन + फेनिलफ्रीन एचसीएल + पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरामाइन मॅलेट + फेनिल प्रोपेनोलामाईन, आणि कॅमिलोफिन डाइहाइड्रोक्लोराइड २५एमजी + पॅरासिटामोल ३००एमजी या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा :

पंजाबच्या अमृतसरमध्ये अनिवासी भारतीयावर गोळीबार

मुरादाबाद बलात्कार प्रकरण; आरोपी शाहनवाजच्या कुटुंबाचे ३ मदरसे सील !

पंतप्रधान मोदी, योगींचे कौतुक केल्यामुळे मुस्लीम महिलेला पतीकडून ‘तिहेरी तलाक’

नालासोपार्‍यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

या औषधांमधील घटकांचे प्रमाण योग्य नसल्याचे आणि कोणत्याही चाचणी शिवाय बाजारात याची विक्री होत असल्याचे समोर आले होते. तज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने ही औषधे असुरक्षित आणि अव्यवहार्य लक्षात घेऊन या औषधांवर बंदी घालण्याची शिफारस आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने कारवाई करत तब्बल १५६ औषधांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

Exit mobile version