अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील काही भागात जंगलातील आग सतत पसरत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यापैकी सर्वात मोठी आग पॅसिफिक पॅलिसेड्स भागात लागली. आगीमुळे १७,२०० एकरपेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली आहे आणि अंदाजे एक हजार वास्तू नष्ट झाल्या आहेत. याच दरम्यान, या घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या हृदयद्रावक कथा समोर आल्या आहेत. ज्यामध्ये आपल्या घराच्या संरक्षांसाठी आगीशी तोंड देताना मृत्यू झाला तर कोणीतरी मदतीला येतील या आशेने घरातच राहिले अन त्यांचा मृत्यू झाला.
द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अँथनी मिशेल आणि त्यांचा मुलगा जस्टिन यांचा अल्ताडेना येथील जंगलात लागलेल्या आगीमुळे मृत्यू झाला. आग लागली तेव्हा दोघेही घरी होते, तर मिशेलचा दुसरा मुलगा जॉर्डन रुग्णालयात होता. मिशेल हे ६७ वर्षीय सेवानिवृत्त सेल्समन होते आणि व्हीलचेअर वापरत होते. तर त्यांचा मुलगा जस्टीन हा सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त असल्याने तोही बेडवरच होता.
मिशेलची मुलगी हाजिम व्हाईटने तिच्या वडिलांचे अंतिम शब्द शेअर केले, ते म्हणाले, बाळा आग लागली आहे आणि आम्हाला येथून बाहेर काढावे लागेल. त्यानंतर ते पुढे म्हणाले, आता मला जावेच लागेल- आग अंगणापर्यंत पोहोचली आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी नंतर कुटुंबाला माहिती दिली की, मिशेल त्याच्या मुलाच्या पलंगावर सापडला होता, आगीमुळे दोघांचाही मृत्यू झाला.
मिशेलची मुलगी हाजिम व्हाईट पुढे म्हणाली, ते आपल्या मुलाला मागे सोडणारे नव्हते. या घटनेमुळे मला खूप दुःख झाले आहे. मुलीने आपल्या वडिलांचे वर्णन एक उदार माणूस म्हणून केले.
हे ही वाचा :
महाकुंभ मेळाव्यानिमित्त आकाशवाणीकडून ‘कुंभवाणी’
हिंदू आध्यात्मिक मेळाव्यात दुसऱ्या दिवशी ‘युग नायक विवेकानंद’, आचार्य वंदन असे कार्यक्रम
बिहारच्या माजी मंत्र्यासह अनेकांवर ईडीचे छापे
मविआचा जागावाटप घोळ दोन दिवसांत संपला असता तर नक्की फायदा झाला असता
अशीच एक दुसरी घटना आहे. ईटनमध्ये पसरलेल्या आगीमुळे ८३ वर्षीय रॉडनी निकर्सन त्यांच्या पलंगावर मृतावस्थेत आढळून आले. त्यांची मुलगी किमिको निकर्सन, यांनी सीबीएस न्यूजला सांगितले की तिच्या वडिलांनी १९६८ मध्ये खरेदी केलेले घर सोडण्यास नकार दिला. किमिकोने सांगितले की, मी स्वतः, माझा भाऊ आणि शेजारील लोकांनी वडिलांना घर सोडण्यास सांगितले. मात्र, त्यांनी घर सोडण्यास नकार देत ठीक असल्याचे सांगितले. ‘मी उद्या तुमच्याकडे येईन’ असे त्यांनी सांगितले. तर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला.