चित्रपटांमध्ये अशी अनेक दृश्ये असतात, ज्यामध्ये चित्रपटाचा हिरो लहान मुलांना किंवा छतावरून पडलेल्या लोकांना वाचवतो. मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यात असाच एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हीडिओत एक चिमुरडी पाचव्या मजल्यावरून खाली कोसळली पण ती चमत्कारिक रित्या बचावली. ज्यामध्ये एका तरुणाने इमारतीतून पडलेल्या बाळाला अलगद झेलून वाचवले आहे.
Heroes among us. pic.twitter.com/PumEDocVvC
— Lijian Zhao 赵立坚 (@zlj517) July 22, 2022
चीनच्या झेजियांग या शहरातील हा व्हिडीओ आहे. झेजियांग येथील एका इमारतीत एक लहान चिमुरडी तिच्या घरात बागडत होती. अचानक ती मुलगी खिडकीतून खाली कोसळली. त्या इमारतीच्या खाली एक माणूस रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत होता. त्याच्यासोबाबत एक महिलासुद्धा होती. त्यांनी खिडकीतुन खाली कोसळताना चिमूरडीला पहिले आणि तिला झेलण्यासाठी या दोघांनी एकच जीवाचा आटापिटा केला. त्या तरुणाने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरडीला झेलून वाचवले. ती मुलगी पाचव्या मजल्यावरून खाली पडली आणि त्या लहान मुलीला त्या तरुणाने अगदी अलगदपणे झेलले आहे.
याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्याला ‘रिअल लाईफ हिरो’ असं संबोधलं जात आहे. हिरो बनून मुलीला वाचवणाऱ्या व्यक्तीचे नाव शेन डोंग असल्याचं सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंकडे की शिंदेंकडे?
पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी
“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”
मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!
हा व्हिडिओ चिनी सरकारी अधिकारी लिजियान झाओ यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. काहींनी मुलीचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तीचे वर्णन ‘रिअल हिरो’ असे केले आहे, तर काहींनी ‘खऱ्या जगातील खरा हिरो जे फक्त चित्रपटातच नसतात, तर ते खऱ्या जगातही असतात’ असे लिहिले आहे. हा १३ सेकंदांचा व्हिडिओ हृदय हेलावून टाकणारा आहे.