आसामच्या जोराहाट परिसरात राहणारे ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जादव पायेंग यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या उजाड, वाळवंटी अशा बेटावर त्यांनी जंगल उभारले आहे. तब्बल तीस वर्षे कष्ट करून त्यांनी एकट्याने ‘मुलाई’चे जंगल उभारले आहे. यापूर्वी या जमिनीवर काहीही उगवत नव्हते, तिथे आता वाघ, हत्ती, सिंह असे जंगली प्राणी वास्तव्याला असून अनेक दुर्मिळ वनस्पतीही बेटावर उगवल्या आहेत. त्यांनी हे जंगल निर्माण केले याची खबर कोणालाही नव्हती. एका पत्राकाराच्या चौकस नजरेमुळे ही गोष्ट समोर आली आणि काही दिवसांतच ही गोष्ट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली. त्यांच्या या अफाट कार्यासाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या बहुमानाने सन्मानित केले.
अशीच कहाणी एका इटलीतील नागरिकाची आहे ज्याने तब्बल ३२ वर्षे एका बेटावर काढली आणि त्या बेटाची व्यवस्थित काळजी घेतली. आता वयाच्या ८२ व्या वर्षी ते शहरात पुन्हा वास्तव्यास परतले आहेत. माउरो मोरांडी असे या अवलियाचे नाव आहे. शहरातील धावपळ, प्रदूषण, गोंगाट या सर्वाला कंटाळून एकांत शोधण्यासाठी, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी त्यांनी बेटावर जाण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत
यंदा कबड्डी.. कबड्डी.. चा आवाज घुमणार बंगळुरूमध्ये!
‘मराठवाडा आणि विदर्भ हे सरकारच्या अजेंड्यावरचं नाही’
दुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?
इटलीतील राजकीय परिस्थितीला कंटाळून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात नव्या आयुष्याला सुरुवात करायची होती, असे मोरांडी यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या नागरी सुविधांपासून दूर असलेल्या पोलिनेशिया येथील ‘ला मॅडलेना’च्या द्वीपसमुहातील एखाद्या बेटावर जायचा त्यांनी निर्णय घेतला. जहाजातून त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला तेव्हा त्यांच्यासोबत अनेक जण होते. तिथे जाऊन व्यवसाय करण्यासाठी हे सगळे जात होते. पण ‘बुडेली’ या बेटावर पोहचताच त्यांना तिथेच रहावेसे वाटले. शिवाय बेटावरचा एकमेव केअरटेकरही वृद्ध झाला होता. तेव्हा त्यांनी बेटाची जबाबदारी घेतली आणि तिथे रहायला सुरुवात केली.
त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी त्यांना अनेक संकटांनाही सामोरे जावे लागले. त्यांना बेटावरून हाकलण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांच्यावर हल्ला झाला. पण ते मागे हटले नाहीत. बेटावर ते ज्या झोपडीत राहत होते त्यात बेकायदेशीर बदल केल्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले. त्यांच्याविरुध्द न्यायलयात दावाही दाखल करण्यात आला. ती झोपडी म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील रेडीओ स्टेशन होते असेही म्हटले गेले. मात्र काही लोकांचे म्हणणे आहे, की त्यांना कोणताही फायदा नसताना ते तिथे राहिले आणि त्यांनी बेट जिवंत ठेवले. त्यांच्यावर आरोप करून उगाच त्यांना त्रास दिला गेला.