24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष‘२,९०० पीडित आहेत कुठे?’

‘२,९०० पीडित आहेत कुठे?’

प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडलवर एचडी कुमारस्वामी यांचा सवाल

Google News Follow

Related

जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी गुरुवारी कर्नाटकातील काँग्रेस सरकारने प्रज्वल रेवण्णा प्रकरणात आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करून कुमारस्वामी यांनी ‘ज्या पीडित महिलांवर माझ्या पुतण्याने कथित अत्याचार केला, त्या महिला कोठे आहेत,’ असा प्रश्न काँग्रेस सरकारला विचारला आहे.

सुमारे २९०० व्हिडिओंमध्ये हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा कथितपणे महिलांशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. राज्यातील काँग्रेस सरकारने व्हिडिओंच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. त्यांनी रेवण्णाच्या कथित पीडितांसाठी एक हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे.

गुरुवारी, जनता दलाच्या (धर्मनिरपेक्ष) शिष्टमंडळाने कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची ‘निःपक्षपाती चौकशी’ करण्याची विनंती करणारे निवेदन सादर केले.प्रज्वल रेवण्णा यांचे काका आणि एचडी रेवण्णा यांचे भाऊ एचडी कुमारस्वामी म्हणाले, ‘आम्ही या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडी राज्यपालांसमोर सादर केल्या आहेत. आम्ही त्यांना केंद्र सरकारला या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती केली आहे.’ सिद्धरामय्या सरकारने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला.

हे ही वाचा:

रतलाममधील काँग्रेस उमेदवार म्हणतो, दोन बायका असतील तर देऊ दोन!

लाच म्हणून मागितला मोबाईल फोन; महिला पोलीस अधिकारी जाळ्यात

पाकला सन्मान द्या, नाहीतर अणुबॉम्ब फोडतील! मणिशंकर अय्यर यांनी दिला फुलटॉस

बडतर्फ केलेल्या सर्व केबिन क्रूला पुन्हा घेतले एअर इंडियाच्या ‘विमाना’त

‘तपास कुठे चालला आहे? यात रेवण्णांची भूमिका काय? त्यांनी रेवण्णांना अटक का केली? राज्य सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. ते पीडित कुठे आहेत? काँग्रेस म्हणतेय २९००हून अधिक पीडित आहेत, पण ते आहेत कुठे?’ असा प्रश्न कुमारस्वामी यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस राज्य सरकारने करावी, अशी मागणी पक्षाने राज्यपालांकडे केली आहे. एसआयटीवर कर्नाटक सरकारचा दबाव असून या प्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला, एचडी कुमारस्वामी यांनी दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण राज्यात कथित व्हिडिओ असलेले २५ हजार पेन ड्राइव्ह वितरित केले गेले होते. एचडी रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांना फसवण्याचा कट रचल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचे डीके शिवकुमार यांना दोष दिला.

तर, डीके शिवकुमार यांनी दावा केला की, पेन ड्राइव्हच्या वितरणामागे एचडी कुमारस्वामी आहेत.
एचडी रेवण्णा यांना या महिन्याच्या सुरुवातीला एसआयटीने कथित व्हिडिओंशी संबंधित अपहरण प्रकरणात अटक केली होती. प्रज्वल रेवण्णा हे परदेशात असल्याची माहिती आहे. त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा