जेडी(एस) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मोठा दावा केला आहे की, काँग्रेसचा एक मंत्री ५०-६० काँग्रेस आमदारांसह भारतीय जनता पक्षात सामील होऊ शकतो.त्यामुळे कर्नाटक सरकार लवकरच पडू शकते, असे एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
तसेच त्यांनी दावा केला की,काँग्रेसचा एक मंत्री आहे ज्यावर अनेक केसेस दाखल आहेत, केंद्र सरकार आपल्याला या केसेस मधून मुक्त करेल या आशेने देखील हे भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होऊ शकतात, अशी शक्यता एचडी कुमारस्वामी यांनी वर्तवली आहे.कर्नाटकातील हसन येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
काँग्रेसचे मंत्री ५० ते ६० आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी पुढे म्हणाले की, काँग्रेसचा मंत्री ‘५० ते ६० आमदारांसह’ काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.तसेच ते सध्या भाजप नेत्यांशी “चर्चा” करत आहेत. “काँग्रेस सरकारमध्ये सर्व काही ठीक नाही, असे जेडी (एस) नेत्याने पत्रकारांना सांगितले. हे सरकार कधी पडेल माहीत नाही.एका प्रभावशाली मंत्र्यावर गुन्हे दाखल आहेत.या गुन्ह्यांमधून पळ काढण्यासाठी ही धावपळ असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
कलम-३७० हटवण्याचा निर्णय योग्यच!
अंतराळ शक्ती बनण्यासाठी भारतीय हवाई दलाने कंबर कसली!
ट्रक चालक आता अनुभवणार ठंडा ठंडा कूल कूल
आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी
कर्नाटकात केव्हाही महाराष्ट्रासारखे काही घडू शकत
एचडी कुमारस्वामी हे काँग्रेसच्या ज्या नेत्यावर आरोप करत आहेत , त्याचे नाव मात्र सांगितले नाही.कुमारस्वामी यांना नेत्याचे नाव विचारले असता ते म्हणाले की, अशा “धाडसी” कृतीची अपेक्षा छोट्या नेत्यांकडून केली जाऊ शकत नाही.केवळ “प्रभावशाली लोक” हे करू शकतात, ते पुढे म्हणाले.तसेच
महाराष्ट्र राज्यात ज्या प्रमाणे राजकारण चालू आहे तसेच कर्नाटकातही होऊ शकते.सध्याचे राजकीय वातावरण पाहता काहीही होऊ शकते,” ते म्हणाले.