हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमीटेड या भारतीय कंपनीने संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान निर्माण केले आहे. या विमानाची जमिनीवरील चाचणी आणि लो स्पीड टॅक्सी ट्रायल्स (एलएसटीटी) देखील पूर्ण केली आहे. हिंदुस्तान-२२८ या विमानाला डीजीसीएकडून प्रमाणपत्र देखील उपलब्ध होणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या पुर्ततेनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम एचएएलच्या कानपूर येथील कारखान्यात आयोजित करण्यात आल्याचे एचएएलच्या बंगळूरू येथील मुख्यालयाकडून सांगण्यात आले होते. डीसीजीएचे संचालक इंद्रनील चक्रबर्तीय यांनी दिलेल्या माहितीनुसार एचएएलला दिलेल्या प्रमाणपत्रामुळे, या विमानाला जागतीक प्रमाणपत्र मिळवण्यास अडचणी येणार नाहीत. या विमानाला एफएआर २३ हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणाऱ्या सर्व अटींची पुर्तता करावी लागणार आहे.
हे ही वाचा:
मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस
रॉजर फेडररचा टेनिसमधून संन्यास? काय झाले आहे वाचा…
राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
या विमानाचा उपयोग, आंतरराज्यीय विमान वाहतूकीसाठी मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकेल. त्याबरोबरच राज्यांतर्गत प्रवासासाठी देखील ही विमाने वापरली जाऊ शकतील. या विमानांचा उपयोग सुलभ दळणवळणासाठी होऊ शकेल, असे सांगितले गेले आहे.
हिंदुस्तान २२८ हे १९ आसनी विमान आहे. या विमानाचा उपयोग अनेक कामांसाठी केला चालू शकणार आहे. ज्यामध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहतूक, प्रवासी वाहतूक, हवाई रुग्णवाहिका इत्यादी प्रकारांचा समावेश आहे. त्याबरोबर विविध साहसी खेळांसाठी देखील या विमानाचा वापर केला जाऊ शकेल.