28.9 C
Mumbai
Monday, April 28, 2025
घरविशेषझारखंड: महायज्ञानंतर मिरवणुकीवर दगडफेक!

झारखंड: महायज्ञानंतर मिरवणुकीवर दगडफेक!

अनेक महिला जखमी, वाहने पेटवली

Google News Follow

Related

झारखंडमधील हजारीबागमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. महायज्ञनंतर काढण्यात आलेल्या शोभा यात्रे दरम्यान कट्टरवाद्यांकडून दगडफेक करण्यात आली. तारबेचवा मशिदीजवळून ही मिरवणूक जात असताना दगडदेकीची घटना घडली. या हल्ल्यात अनेक महिला जखमी झाल्या. दगडफेकीमुळे संतप्त झालेल्या लोकांनी जीटी रोड रोखला. यानंतर, तणाव लक्षात घेऊन संपूर्ण परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. यानंतर आता परिस्थिती सामान्य आहे.

रविवारी (१३ एप्रिल) हे महायज्ञ आयोजित केले जात होते आणि या महायज्ञासाठी मिरवणूक काढली जात होती. जेव्हा ही मिरवणूक तारबेचावा मशिदीजवळ पोहोचली तेव्हा दुसऱ्या समुदायाकडून दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यात अनेक महिला जखमी झाल्या. यावेळी दंगलखोरांनी आजूबाजूच्या परिसरात जाळपोळही केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी जीटी रोड रोखला आणि त्वरित कारवाईची मागणी केली.

ही घटना बरकाठा ब्लॉकमधील झुरझुरी गावात घडली. यावेळी हल्लेखोरांनी बराच गोंधळ घातला. हल्लेखोरांनी एका घराला आग लावली. यामुळे घरात ठेवलेले सर्व सामान जळून खाक झाले. यासह एका दुचाकीला देखील आग लागली. दंगलखोरांनी रस्त्यांवर गवताच्या पेंढ्या टाकत त्या पेटवून दिल्या. या घटनेतील आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. तोडफोड आणि जाळपोळीनंतर संपूर्ण गावात गोंधळ उडाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रस्ता अडवून कारवाईची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत नागरिकांची समजूत काढली आणि यानंतर गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

हे ही वाचा : 

गुजरातजवळील अरबी समुद्रातून १,८०० कोटींचे ३०० किलो ड्रग्ज जप्त

पवन कल्याण यांच्या पत्नीने तिरुमला मंदिरात केले केस दान; काय आहे कारण?

म्यानमार: ‘ऑपरेशन ब्रह्मा’मध्ये सहभागी असलेल्या हवाई दलाच्या विमानावर जीपीएस स्पूफिंग हल्ला

पीएनबी घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

दरम्यान, दगडफेकीनंतर गावातील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस दल परिसरात उपस्थित आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे एसपींनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, गुन्हेगारांची ओळख पटवली जात आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणाखाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा