25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषदादरमध्ये फेरीवाल्यांचा उच्छाद, सर्वसामान्यांचा जीव नकोसा!

दादरमध्ये फेरीवाल्यांचा उच्छाद, सर्वसामान्यांचा जीव नकोसा!

भाड्याच्या दुकानांसाठी सुमारे २ लाख ते ४ लाख एवढी रक्कम

Google News Follow

Related

दादर आणि गर्दी हे अनोखं नातं. दादर एक बाजारपेठ आहे. दुकानांपासून ते रस्त्यांपर्यंत सर्वांना परवडणारी दुकाने दादरमध्ये थाटलेली दिसतात. दादरमधील फेरीवाल्यांच्या मनस्तापाचा मुद्दा तसा जुनाच आहे, पण या फेरीवाल्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाल्यामुळे दादरमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना, दादर रेल्वेस्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांना जीव नकोसा झाला आहे. या फेरीवाल्यांचे कोणतेही नियोजन नाही. फूटपाथपासून रस्त्यापर्यंत सगळा दादरचा परिसर फेरीवाल्यांनी ताब्यात घेतला आहे.

मराठी, मारवाडी आणि गुजराथी दुकानदारांचे प्राबल्य दादरमध्ये राहिलेले आहे. पण आता फूटपाथ आणि त्यापुढील रस्तेही फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. फूटपाथवरून आपल्या दुकानात, ठेल्यावर किंवा पथारीपाशी येण्यासाठी आरोळ्या देणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

दादरमध्ये गेले कित्येक वर्षे फेरीवाले आपला बस्तान मांडून बसलेत. या फेरीवाल्यांकडून येथे बसण्याचे पैसे कित्येक वर्षे कोणीतरी भलताच माणूस उकळून आपल्या खिशात टाकतोय, असा आरोप होतो. हे पैसे जमवण्यासाठी लाइनवाले नेमलेले आहेत. हे लाइनमन येथून या फेरीवाल्यांक़डून पैसे वसूल करून योग्य ठिकाणी पोहोचवतात. हे पैसे किती होतात याचा आकड्यांचा विचार करा. जर बीएमसीने यांना रितसर पावती फाडून ही रक्कम वसूल केली तर किती पैशांची आतापर्यंतसरकारी तिजोरीत भर पडली असती, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतो.

फेरीवाला कायद्यानुसार स्टेशन, शाळा, मंदिर-मस्जिद यांच्या १५० मिटरच्या आवारात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. तरीही दादरमध्ये हे फेरीवाले बिनदिक्कत बसतात, यांना बसायला देण्यास कोणाचा वरदहस्त आहे. कुठे गेले नियम. कोण नियम धाब्यावर बसवतोय, यांच्यावर कारवाई का करत नाही, हे कळायला मार्ग नाही. असे असंख्य प्रश्न निर्माण होतात.
दादर स्टेशनमध्ये बीएसटीची A११८ नंबरची बस प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केली आहे. परंतु ही बस कबुतरखाना येथून आत घेताना चालकाला कसरत करावी लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजू आणि दोन्हीही फूटपाथ फेरीवाले आणि टॅक्सीवाल्यांनी हा रस्ता व्यापून टाकला आहे. त्यातच फूटपाथवर चालायला जागा नसल्याने लोकं रस्त्यावरच चालतात. त्यातच भर म्हणजे ही बस प्रवासी भरल्यानंतर फिरवायला जागा नसते. तेथेही फेरीवाले बसलेले असतात. टॅक्सी उभ्या असतात. या टॅक्सी पकडण्यासाठी रस्त्यावरच रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे ही बस कामत दुकानाच्या येथील समोरील रोडवर घुसून मागे घेण्यात येते. ही बस मागे घेताना तेथे उभे असलेले टीसी आणि कंडक्टर बसवर थापा मारून मागे घेण्याचे चित्र दिसते. जर ही मागे घेताना एखादा अपघात घडला तर याला जबाबदार कोण.

गाळेधारकांत हा टक्का कसा वाढला?

सध्या आणखी एका मुद्द्याने येथील स्थानिक लोकांच्या मनात शंकेचे काहूर माजले आहे. ते म्हणजे फेरीवाल्यांमध्ये मराठीचा कमी होत असलेला टक्का. अचानक बांगलादेशी आणि मुस्लिम फेरीवाल्यांचा, दुकानदारांचा वाढलेला टक्का. स्थानिक नेत्यांकडून यासंदर्भात दबक्या आवाजात बोलले जाते. हे चित्र तुम्हाला मामा काणे यांच्या दुकानापासून फार दुसऱ्या टोकापर्यंत नजरेस पडते. एकेकाळी मराठी, गुजराती, मारवाडी माणसाची दादरच्या धंद्यावर असलेली पकड हळूहळू सैल पडत चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. ज्या दादरमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या फार नाही तिथे अनेक गाळे, दुकाने मुस्लिमांच्या ताब्यात का गेली असा सवाल इथे वावरणारे विविध पक्षांचे कार्यकर्ते विचारतात.
दादरमध्ये जमाल आणि शमसुद्दीन या दोघांच्या कारनाम्यांची मध्यंतरी पोलखोल झाली. फेरीवाल्यांवर त्यांचा अंकुश होता. जमाल याला अटक करून त्याच्यावर खंडणीचा आरोप करून त्याला अटकही झाली. परंतु जमाल याला अटक केल्यानंतर बी टीम तयार झाल्याचे सांगितले. आता ही लोकं फेरीवाल्यांकडून पैसे वसूल करतात, असे एका दुकानदाराने खासगीत सांगितले.

वड्याळ्याच्या डेपोच्या बाहेर ही मंडळी उभे राहून कोणाचा माल उचलायचा आणि सोडायचा, किती पैसे घ्यायचे हे ठरवतात, असे बोलले जातेय. यावरून एक जमाल गेल्यानंतर अनेक जमाल निर्माण होताहेत का असा प्रश्न निर्माण होतो आहे.

भाड्याच्या दुकानांसाठी सुमारे २ लाख ते ४ लाख एवढी रक्कम आकारली जाते आहे. ती मोजण्याची तयारीही दाखविणारे आहेत. दादर बदलत आहे. फेरीवाल्यांचा त्रास वाढतो आहे. मराठी माणसाचे दादर हे समीकरणही बदलत आहे. येत्या काळात काय बदल पाहावे लागतील याची प्रतीक्षा दादरकर करत आहेत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा