ठाकरे सरकारने राज्यावर निर्बंध लावले, पण तोही प्रकार अगदी दुजाभाव केल्याप्रमाणेच. व्यापारी वर्ग आजही धंदा नाही या चिंतेत आहे, परंतु फेरीवाले मात्र मोकाट धंदा करताहेत. त्यामुळे आता व्यापारी वर्गानेही थेट मोदींनाच साकडे घातले. व्यापारी वर्गाची दुकाने बंद दुसरीकडे फेरीवाले मात्र मोकाट धंदा करत आहेत. ही होणारी गर्दी आता कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरू शकते हे असे चित्र सध्याच्या घडीला राज्यात आहे.
अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रस्त्यावर फेरीवाले सर्रास बसलेले दिसतात. त्यांना मात्र कुठलीच आडकाठी केली जात नाही. मग व्यापारी वर्गाचीच अशी अडवणूक का केली जाते, असा प्रश्न व्यापारी वर्गाने ठाकरे सरकारला विचारला आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने ओबीसी समाजाला बेसावध ठेवले
अनिल देशमुख यांनी ईडीकडे मागितला वेळ
आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांची धरपकड सुरु
देवेंद्र फडणवीस नागपूर पोलिसांच्या ताब्यात
राज्यातील सर्वच शहरांना आता क्रमांक ३ चे निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे व्यापारी वर्ग आता हवालदिल झालेला आहे. व्यापारी वर्गाला एक न्याय आणि फेरीवाल्यांना दुसरा न्याय असा सवालच आता व्यापारी वर्ग सरकारला विचारत आहे. शहरात जागोजागी फेरीवाले बसत असून, आठवडी बाजारही अगदी उत्तम सुरु आहे. मग व्यापारी वर्गावर अन्याय का असा परखड सवाल आता व्यापारी करत आहेत. कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये अनेक व्यापारी अक्षरशः तोट्यात गेले. जवळपास दीड वर्षांपासून व्यापारी वर्गाचा धंदाच नाही. आता कुठे थोडी उसंत मिळाली ती पण आता बंद होणार याची चिंता व्यापारी वर्ग सध्या करताना दिसत आहे.
आठवडी बाजारांमध्ये नियम धाब्यावर बसवून फेरीवाले बिनदीक्कतपणे फिरतात त्यांच्यावर मात्र कुठलाच अंकुश नाही. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक फारसे उत्सुकही नसल्याचे व्यापारी म्हणतात. त्यामुळेच प्रत्येक वेळी व्यापारी वर्गच निशाण्यावर का असा प्रश्न आता प्रशासनाला विचारण्यात येत आहे. एकूणच महाराष्ट्रात सततच्या निर्बंधामुळे अनेक धंदे कोलमडले आहेत. अनेक बंद झाले, काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तरी ठाकरे सरकार अजूनही आडमुठेपणा सोडत नाही. त्यामुळे सर्वच स्तरातून आता नाराजीचा सूर उमटत आहे.