ठाण्यातील फेरीवाल्याने ठाणे महापालिकेच्या सहाय्यक अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूहल्ला केला. यामध्ये त्यांची बोटे तुटली, सध्या त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही पार पडलेली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच ठाण्यात अजून एक मूर्खपणाचा कळस गाठणारा प्रकार झालेला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या लिपिकाचा वाढदिवस साजरा करण्याकरता फेरीवाले थेट कार्यालयात दाखल झाले. लिपिक विवेक महाडिक याला याकरता निलंबितही करण्यात आलेले आहे. त्यामुळेच आता पालिकेतील कर्मचारी वर्गाच्या वर्तणुकीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. एकीकडे कल्पिता यांच्यावर चाकूहल्ला झालेले प्रकरण ताजे आहे. त्यात अगदी कार्यालयात येऊन वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार घडलेला आहे. संबंधित लिपिकाला याप्रकरणी आता निलंबित करण्यात आलेले आहे. कर्मचारी आणि फेरीवाले यांचं साटंलोटं कसं होतं याबाबत एक धक्कादायक खुलासा या माध्यमातून झालेला आहे.
ठाणे महानगरपालिकेने नौपाडा अतिक्रमण विभागातील क्लर्क विवेक महाडिक यांना निलंबित केले आहे. याच क्लर्कचा वाढदिवस काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांनी साजरा केला होता.
विवेक महाडिक या क्लर्कचे फेरीवाल्यांसोबत जवळचे संबंध आहे. एवढंच नाहीतर विवेक महाडीक यांच्या शासकीय कार्यालयात येऊन फेरीवाल्यांनी विवेक महाडिक यांचा वाढदिवस देखील साजरा केला होता. वाढदिवसाचे फोटो आता सर्वठिकाणी व्हायरल झालेले आहेत. या फोटोवरून स्पष्टपणे दिसते की, अधिकारी आणि फेरीवाले यांचे किती घनिष्ट हितसंबंध आहेत.
हे ही वाचा:
जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा
फोर्ब्सच्या यादीमुळे मिळाला नवा ‘आनंद’
पालिकेचे जलतरण तलाव की ‘कुरण तलाव’?
ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी हा दावा केलाय की, ‘त्यांनीच हा फोटो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांना दिला होता आणि या फोटोच्या आधारित ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त बिपीन शर्मा यांनी विवेक महाडिक या क्लार्कवर कारवाई केलेली आहे.