सुप्रिया ताई गोवारी हत्याकांड विसरलात का?

भाजपा महिला आमदार चित्रा यांचा सवाल 

सुप्रिया ताई गोवारी हत्याकांड विसरलात का?

बीड आणि परभणीतील प्रकरणावरून विरोधक राजकारण करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांची भेट घेतली होती. या दोन्ही प्रकरणाची तपासणी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिले आहे. मात्र, विरोधक वारंवार मुद्दा उपस्थित करून सरकारला लक्ष करताना दिसत आहेत. याच दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला नेत्या सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य समोर आले आहे.

झालेल्या घटनांवर विश्वास बसत नसल्याचे त्यांनी म्हटले. जे सिनेमात पाहिले ते वास्तव महाराष्ट्रमध्ये पाहायला मिळत आहेः. आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल मला भीती वाटते, मला कधीही भीती वाटली नाही पण आता वाटते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत, त्यांनी महाराष्ट्रला न्याय द्यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर भाजपा महिला आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. गुन्हेगारांना इथे माफी मिळत नाही की पाठीशी सुद्धा घातलं जातं नाही. गोवारी हत्याकांड विसरलात का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा यशस्वी प्रारंभ

हसनपुरा भागात तोडफोड : मुजम्मिल, इम्रान आणि टोळीला अटक

करचोरी, करगळती रोखून रिझल्ट ओरियंटेड काम करा

आता अमेठीमध्ये १२० वर्षे जुने शिवमंदिर सापडले

चित्रा वाघ यांनी ट्वीटकरत म्हटले, बीड परभणी मध्ये घडलेल्या घटना नक्कीच दुर्दैवी आहेत, पण त्या घटनांची न्यायालयीन चौकशी होणार आहे. गुन्हेगारांना इथे माफी मिळत नाही की पाठीशी सुद्धा घातलं जातं नाही. कारण दुर्दैवी घटना घडल्या की गुन्हेगाराला पाठीशी घालायचं हे तुमच्या वेळी सर्रास चालायचं.

गोवारी हत्याकांड विसरलात का? आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा नादात मुंबईतील १३ वा कथित बॉम्ब ब्लास्ट…? लिस्ट करायची झाली तर ती वाढत जाईल. मोठ्ठ्या ताई लक्षात ठेवा महाराष्ट्र आमच्या देवाभाऊंच्या सुरक्षित हातात आहे. आता तुमचं जातीवाद आणि प्रांतवादाचे राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही, कारण जनता जनार्दनला समजलं आहे की एक है तो सेफ है, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

 

Exit mobile version