हिमाचलमध्ये काँग्रेसच्या पराभवाची हॅट्रिक!

निरीक्षक हायकमांडला अहवाल सादर करणार

हिमाचलमध्ये काँग्रेसच्या पराभवाची हॅट्रिक!

हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चारही जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे.भारतीय जनता पक्षाच्या चारही जागांवर विजयाची ही हॅट्रिक आहे.हिमाचल प्रदेशात काँग्रेसला सततचा पराभवाचा सामना करावा लागत आहे.दरम्यान, देशात इंडी आघाडीची आणि आणि विशेषतः काँग्रेसची कामगिरी पाहीली तरी हिमाचलमध्ये काँग्रेसला कोणताही मोठा पराक्रम दाखवता आला नाही.

सततच्या प्रभावामुळे हिमाचल मधील काँग्रेसचे कार्यकर्तेही निराश झाले आहेत. लवकरच काँग्रेस निरीक्षक पराभवावर विचारमंथन करून अहवाल हायकमांडला सादर करणार आहेत.विशेष म्हणजे हिमाचलच्या बाबतीत आजपर्यंत काँग्रेस संघटना असो किंवा सरकार यांनी कोणीही जबाबदारी घेतलेली नाही.हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार सध्या समाधानी आहेत.कारण राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत सहापैकी चार जागा काँग्रेसच्या बाजूने आल्या आहेत.

हे ही वाचा:

संसदेतील घुसखोरीप्रकरणात हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!

एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!

पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते, हिमाचल काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि थिओग विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुलदीप सिंह राठोड म्हणाले की,हिमाचल प्रदेशमध्ये विचारमंथन करणे आवश्यक आहे.हिमाचल प्रदेशात हिंदू बहुसंख्य आहेत.अशा परिस्थितीत राम मंदिराचा मुद्दा इथेही गाजला.ते पुढे म्हणाले की, हिमाचल प्रदेशातील पराभवावर चर्चा होणे गरजेचे आहे.निरीक्षक लवकरच पराभवावर विचारमंथन करतील आणि त्याचा अहवाल तयार करून तो काँग्रेस हायकमांडला सादर करतील, ते पुढे म्हणाले.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभेत हिमाचलमध्ये भाजपने चारही जागांवर विजय मिळविला असून काँग्रेसचा पराभव झाला आहे.यापूर्वी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार भाजपकडून पराभूत झाले होते.

Exit mobile version