हास्यजत्राचे कलाकार होणार करोडपती

हास्यजत्राचे कलाकार होणार करोडपती

सोनी मराठी या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील हास्यजत्रा या कार्यक्रमाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील कलाकार आज मराठीतील ‘कोण होणार करोडपती?’ या मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेत हे कलाकार लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणसाठी खेळणार आहेत.

हास्यजत्रेतील कलाकार समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून या खेळात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणच्या पुनर्उभारणीसाठी मदत करणार आहेत. त्यासाठी हास्यजत्रेच्या टीममधील सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि समिर चौघुले यांनी कोण होणार करोडपतीच्या मंचावर आपली उपस्थिती लावली.

हे ही वाचा:

जिथे पाकिस्तानी ध्वज फडकायचा तिथे आज आहे तिरंग्याचा मान

दरडग्रस्तांना मदत करण्यात ठाकरे सरकार अपयशी

हातमाग दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ‘या’ ट्विटला दिली पसंती

भारत – चीन संघर्षाचे स्वरूप बदलते आहे! काय आहे स्थिती?

यंदाचे वर्ष हे लोकमान्य टिळकांचे १०१ वे पुण्यस्मरण आहे. चिपळूणला असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आहे, ज्याठिकाणी हजारोंची ग्रंथसंपदा, अश्मयुगीन हत्यारे, शिवकालीन ढाल तलवारी इत्यादी हत्यारे, सातवाहनकालीन नाणी, वेगवेगल्या कालखंडातील दस्तऐवज, मूर्ती, नाणी, भांडी, दिवे, जन्मपत्रिका, मान्यवर नेत्यांच्या स्वाक्षऱ्या अशा विविध मौल्यवान वस्तूंचा संग्रह केलेला आहे. मात्र नुकत्याच आलेल्या पुरामध्ये या वाचन मंदिराचे नुकसान झाले होते. या वाचन मंदिराला पुन्हा उभे करता यावे यासाठी हास्यजत्रेतील कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्याबरोबरच चिपळूणमधील १५६ वर्षांचा हा इतिहास पुन्हा जागृत करण्यासाठी अशोक नायगावकर यांच्यासारखे इतरही काही मान्यवर पुढे सरसावले आहेत.

कोण होणार करोडपतीच्या मंचावर देखील हास्यजत्रेतील कलाकारांनी दंगा केला. विशाखा सुभेदार आणि समिर चौघुले यांच्या जाऊया गप्पांच्या गावा या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन देखील केले. या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षकांना आज, शनिवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर घेता येणार आहे.

Exit mobile version