नायब सिंग सैनी दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ!

मंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत झाली निवड

नायब सिंग सैनी दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ!

नायबसिंग सैनी हरियाणाचे मुख्यमंत्री बनणार आहेत. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. नायबसिंग सैनी यांची हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत नायब सिंग सैनी यांची एकमताने मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली.

उद्या १७ ऑक्टोबर रोजी नायबसिंग सैनी दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून नायबसिंग सैनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पक्षाचे नेता अनिल विज आणि राव इंद्रजीत सिंह हे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, केंद्रींय मंत्री अमित शाह यांनी स्वतः हाती कमान घेतली आणि एकतेचा संदेश दिला.

हे ही वाचा : 

एकीकडे विरोधकांचा योजनेसाठीच्या पैशांवर सवाल; दुसरीकडे योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन

ओमर अब्दुल्ला यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!

विधानसभा निवडणुकीनंतर मनसे सत्तेत असेल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अंधार कोठडीत रवानगी?

नायब सिंग सैनी यांची हरियाणाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता सरकार स्थापनेचा दावा राजभवनात सादर केला जाणार असून पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. गुरुवारी (१७ ऑक्टोबर) शपथविधी सोहळा होणार आहे. विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नायब सिंह सैनी यांनी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सांगितले की, हरियाणातील लोकांनी पंतप्रधान मोदींच्या धोरणांना मान्यता दिली आहे. आजच राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.

Exit mobile version