हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२८ सप्टेंबर) हरियाणा दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान मोदींची हरियाणातील हिसार येथे सभा पार पडली. सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसमधील अंतर्गत चालू असलेल्या वादांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लढाई सुरू आहे. बापूही दावेदार आहे आणि मुलगाही दावेदार आहे. दोघेही मिळून बाकीच्यांना लीपटवण्याच्या कामात व्यस्त आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जिथे काँग्रेस आहे तिथे कधीही स्थिरता असू शकत नाही. जो पक्ष आपल्या नेत्यांमध्ये एकजूट आणू शकत नाही, तो राज्यात स्थैर्य कसे आणणार?, असा सवालही पंतप्रधानांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, हरियाणातील जनता काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांमध्ये अडकणार नाही. काँग्रेस हा देशातील सर्वात फसवा आणि बेईमान पक्ष आहे. काँग्रेसला संपूर्ण दलित समाजाचा द्वेष आहे. दलित आणि मागासवर्गीयांसाठी काँग्रेसचे दरवाजे पूर्णपणे बंद आहेत. काँग्रेसचे राजघराणे दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण संपण्याची भाषा करत आहेत, मुळात म्हणजे त्यांची विचारसरणीच दलित आणि मागासवर्ग विरोधी आहे.
हे ही वाचा :
आरोपी असलेल्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी राहुल गांधी आहेत का ?
हिजबुल्लाच्या प्रमुखाच्या हत्येची चर्चा, इराणच्या सर्वोच्च नेत्याला सुरक्षित स्थळी हलवले!
वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात समाधानाच्या क्षणासाठी तीर्थदर्शन योजना
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संबोधले नाच-गाण्याचा कार्यक्रम!
ते पुढे म्हणाले, मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसा काँग्रेसचा पराभव होत आहे. काँग्रेसचे नेते आता बोलू लागले आहेत की, हरियाणातही तशीच परिस्थिती होईल, जशी मध्य प्रदेशात होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या गेल्या निवडणुकीत त्यांनी खोटी व्यक्तव्ये करून मोठा फुगा फुगवला, मात्र जनतेने मतदान करून त्यांच्या फुग्याची हवाच काढून टाकली. आता हरियाणातही तेच होणार आहे.