हरियाणा विधानसभा प्रचाराचे नेतृत्व पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांच्या हाती !

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

हरियाणा विधानसभा प्रचाराचे नेतृत्व पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांच्या हाती !

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. आपल्या यादीत भाजपने ४० स्टार प्रचारकांना स्थान दिले आहे. तसेच काँग्रेसने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसारख्या दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने सर्व ९० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपच्या यादीवर नजर टाकली तर पीएम मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांची नावे आहेत. यामध्ये फोगट बहिणींपैकी एक बबिता फोगट यांच्याही नावाचा समावेश आहे.

हरियाणाच्या विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक तोंडावर असल्याने सर्व राजकीय पक्षांनी आपआपली तयारी सुरु केली आहे. सर्व जागांवर सर्वपक्षीय पक्षांनी उमेदवार देखील जाहीर केले आहेत.

हे ही वाचा :

बिहारमध्ये बलात्कार करू पाहणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर नर्सने केले वार !

मोहम्मद झाला हर्षित चौधरी, बनावट लष्करी कार्ड, २४ महिलांना फसवले, वंदे भारतमध्ये केली होती चोरी !

माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन

राजकोट पुतळा प्रकरण: जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

दरम्यान, काँग्रेसनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या यादीत मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह एकूण ४० नावांचा समावेश आहे. भूपेंद्र सिंग हुड्डा, कुमारी शैलजा, रणदीप सिंग सुरजेवाला, विनेश फोगट, बजरंग पुनिया यांच्या नावांचाही समावेश आहे.

Exit mobile version