हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप मोठे चाहते आहेत आणि म्हणूनच ते पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा एकही भाग चुकवत नाहीत. आज (२७ एप्रिल) जेव्हा नायब सिंग सैनी मन की बात ऐकण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास थोडा उशीर झाला तेव्हा त्यांनी चालत्या गाडीत मन की बातचा भाग पाहण्यास सुरुवात केली. एक्सवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा हरियाणामध्ये येतात तेव्हा ते मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचे खूप कौतुक करतात. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे चाहते आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा एकही भाग चुकवत नाहीत. आज त्यांच्या मन कि बातचा १२१ वा भाग होता आणि मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांना सर्वांबरोबर तो बघायचा होता. मात्र, मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ झाला. पण, त्यांना कार्यक्रमाचा भाग चुकवायचा नव्हता, मग काय त्यांनी आपला मोबाईल काढला आणि चालत्या गाडीत मन कि बातचा भाग पाहण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा :
घाटकोपर: सोमय्यांच्या तक्रारीनंतर मुस्लीम जमात गौसिया मशिदीचे भोंगे उतरवले!
विक्रोळीत १३ बांग्लादेशी फेरीवाले ताब्यात!
भारतात ६२५ विमान मार्ग सुरू, १.४९ कोटी प्रवाशांना याचा फायदा
पाकिस्तानने अफगाणिस्तानात लढलेल्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवले!
याबाबत त्यांनी एक्सवर ट्वीटही केले. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, “जिथे इच्छाशक्ती असते, तिथे मार्ग असतो.” पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांच्या कामाबद्दलची त्यांची निष्ठा कोणापासूनही लपलेली नाही आणि आपण सर्वजण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो.
ते पुढे म्हणाले, आज मोदीजींच्या “मन की बात” कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यास थोडा उशीर झाला, म्हणून मी प्रवासादरम्यान माझ्या मोबाईलवर कार्यक्रम पाहण्यास सुरुवात केली. वेळेचा चांगला वापर करून, मी काही वेळातच कार्यक्रमस्थळी पोहोचलो.
जहां चाह, वहां राह!
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी सभी के लिए प्रेरणा के स्रोत हैं, अपने कार्य के प्रति उनकी निष्ठा किसी से छिपी नहीं है और हम सभी उनसे प्रेरणा लेकर उसी राह पर चलने की पूरी कोशिश करते हैं।
आज मोदी जी के “मन की बात” कार्यक्रम स्थल पर पहुंचने में थोड़ी… pic.twitter.com/dmPhxdvVcs
— Nayab Saini (@NayabSainiBJP) April 27, 2025