भाजपच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारने अग्निवीरांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी बुधवारी (१७ जुलै) अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात भरती झालेल्या अग्निवीरांसाठी पोलीस आणि खाण रक्षकांच्या नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री नायब सैनी म्हणाले की, अग्निवीर योजना जवळपास दोन वर्षांपूर्वी १४ जून २०२२ रोजी लागू करण्यात आली होती. या अंतर्गत भारतीय सैन्यात चार वर्षांसाठी तैनात करण्यात येते. अग्निवीर योजनेमुळे कुशल आणि सक्रिय तरुण तयार होतात. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी घोषणा केली की, अग्निवीरांना पोलीस शिपाई, खाणकाम, गार्ड, जेल गार्ड आणि एसपीओच्या भरतीमध्ये १० टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच ग्रुप ‘सी’ वर्गाच्या भरतींमध्ये तीन वर्षांची सवलत दिली जाईल. ग्रुप ‘बी’ च्या भरतीत पाच टक्के आणि ग्रुप ‘ए’ च्या भरतीत एक टक्का आरक्षण दिले जाईल.
हे ही वाचा:
‘आसाममध्ये गंभीर प्रश्न, मुस्लिम लोकसंख्या १२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर’
शिवकालीन वाघनखे महाराष्ट्रात आली!
महिला आशिया कप स्पर्धेचा थरार रंगणार; भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात
तसेच जर एखाद्या अग्निवीरला स्वतःचा उद्योग उद्योग सुरु करायचा असेल तर त्यास ५ लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळेल. अग्निशमन दलाच्या जवानांना शस्त्र परवाने दिले जातील. काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसने अग्निवीर योजनेबाबत खोटा प्रचार केला असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, अग्निवीर ही पंतप्रधानांची लोककल्याणकारी योजना आहे. त्यामुळे काँग्रेस लोकांचा भ्रमनिरास करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.