ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) संयुक्त विद्यमाने कोर्ट चॅम्पियन्स २४ आयोजित एनएससीआय- योनेक्स सनराईज-महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत हर्षित माहिमकर आणि प्रिशा शाहने प्रत्येकी दोन जेतेपदांवर नाव कोरले.
विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब कोर्टवर झालेल्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत बिगरमानांकित हर्षितने चौथ्या सीडेड सोहम फाटकवर २१-१२, २१-७ असा विजय मिळवला. तत्पूर्वी, सर्वोत्तम कामगिरीमध्ये सातत्य राखताना १७ वर्षांखालील मुले एकेरी गटाच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित तनय मेहेंदळेवर सरळ गेममध्ये २१-७, २१-१३ अशी मात केली. या गटात हर्षितला दुसरे सीडिंग होते.
प्रिशाने महिला एकेरीसह १७ वर्षांखालील मुली एकेरी गटात बाजी मारली. महिला गटात तिने देवांशी शिंदेला २१-१८, २१-१०असे सरळ गेममध्ये हरवले. १७ वर्षांखालील एकेरी गटात दुसरे सीडिंग असलेल्या प्रिशाने बिनसीडेड खुशी पाहवावर २१-१६, २१-१६अशी मात केली.
हे ही वाचा:
सपाला मतदान करण्यास नकार देणाऱ्या तरुणीची मैनपुरीमध्ये हत्या
चेन्नईत बीएमडब्ल्यूच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू
तावडे यांनी कुठलेही पैसे वाटलेले नाहीत!
निकाल (सर्व अंतिम फेरी): ११ वर्षांखालील मुले एकेरी: प्रिया अंबुर्ले विजयी वि. समिक्षा मिश्रा २१-१४, १६-२१, २१-१३.
१३ वर्षांखालील मुली एकेरी: अन्विषा घोरपडे विजयी वि. इमान मोटरवाला १४-२१, २१-१२, २१-१३.
१५ वर्षांखालील मुली एकेरी: खुशी पाहवा विजयी वि. आर्य मेस्त्री २१-१४, १८-२१, २१-१८.
१७ वर्षांखालील मुली एकेरी: प्रिशा शाह विजयी वि. खुशी पाहवा २१-१६, २१-१६.
११ वर्षांखालील मुले एकेरी: अल्फी मेक्कादाथ विजयी वि. अरहम भंडारी २१-११, २०-२२, २१-१८.
१३ वर्षांखालील मुले एकेरी: श्लोक गोयल विजयी वि. रुहान भाटिया २१-१३, २१-१६.
१५ वर्षांखालील मुले एकेरी: प्रफुल्ल पटेल विजयी वि. कृती पटेल १६-२१, २१-१५, २१-१५.
१७ वर्षांखालील मुले एकेरी: हर्षित माहिमकर विजयी वि. तनय