दहा तासानंतर तो म्हणाला, आप्पा, मी सुरक्षित आहे!

दहा तासानंतर तो म्हणाला, आप्पा, मी सुरक्षित आहे!

‘टायटॅनिक’चा थरारक अनुभव

पी ३०५ बार्जने टायटॅनिक या चित्रपटाच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. टायटॅनिक चित्रपटाचा क्लायमॅक्स आपल्या प्रत्येकाच्या मनावर कोरला गेला. श्वास रोखणारा तो क्लायमॅक्स कुणाच्या तरी आयुष्याचा भाग होईल, असे कधीही वाटले नव्हते. पण असे घडले. पी ३०५ बार्जमधील प्रवासी पाण्यात गंटागळ्या खात होते. जगण्यामरण्यापलीकडे सुद्धा एक प्रवास असतो तो अनुभवलाय दस्तुरखुद्द टिजू सेबॅस्टियन याने. वय वर्ष ३१, दहा पेक्षा अधिक तास टिजू समुद्रातील लाटांमध्ये तरंगत होता, फेकला जात होता. पण अखेर नौदलाने त्याची सुटका केली. सुटका केलेल्यांपैकी अनेकजण आज अजूनही सावरलेले नाहीत. मृत्यू समोर उभा असल्याचा भयंकर अनुभव टिजूला आला.

हे ही वाचा:

राज्य सरकारच्या हिटलरशाही विरोधात भाजपा कार्यकर्ता लढत राहील

सुशील कुमारला ६ दिवसांची पोलिस कोठडी

काँग्रेस नेत्याने केली ठाकरे सरकारची पोलखोल

मी काहीही करत नाहीये…मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक कबुली

टिजू हा पी ३०५ मध्ये एक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होता. मुंबईतील इस्पितळातून बाहेर पडून टिजू त्याच्या घरी रवाना झाला. टिजूला नौदलाने वाचवल्यावर टिजूने घरी फोन केला आणि फक्त इतकंच म्हणाला, आप्पा मी सुरक्षित आहे. टिजूचा फोनवरील आवाजाने घरच्यांच्या जीवात जीव आला. तेव्हा कुठे कोचीतील त्याच्या घरच्यांनी देवाचा धावा थांबवला.

चक्रीवादळामध्ये बार्ज सापडण्याआधी टिजूने आपल्या पत्नीला अलीशा स्वर्ण हिला शेवटचा संदेश केला होता. टिजूचा बार्ज बुडाला हे कळताक्षणी कुटूंबाने मात्र धीर सोडला. शेवटचा धावा म्हणून देवाचा हे कुटूंब करत होते. अखेर टिजूचा फोन आला आणि हा धावा थांबला.

बार्ज मजबूत होते, त्यामुळे नांगरावर बार्ज तग धरेल असे वाटत होते. परंतु वादळात मात्र नांगरानेही दम तोडला. तिथेच शेवटच्या घटका मोजण्यास सुरुवात झाली असे टिजूने म्हटले. बार्जच्या एका सपाट भागाला पकडून टिजूने वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी एका ठिकाणी आपटला आणि टिजूच्या हातून तो सपाट भाग सुटला. अखेर लाइफ जॅकेट घालून पाण्यात उडी मारण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पाण्यात उडी मारली पण हाडं गोठवणारी ती पाण्यातील थंडी यात भानही हरपले. डोळ्यात समुद्राचे खारट पाणी गेल्यामुळे डोळ्यांनी दिसेनासे झाले. तब्बल दहा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर टिजू अखेर सापडला, असे टिन्सी टिजूचा मित्र म्हणाला.

टिजूने त्याला म्हटंले, ज्याक्षणी मी समुद्रात उडी मारली त्यावेळी मी यातून वाचेन अशी कल्पनाही केली नाही. यापुढे आपले कुटूंब आपल्याला दिसणार नाही हेच टिजूच्या डोक्यात होते. टिजू आता घरी पोहोचला त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी आहे, असे टिन्सीने यावेळी सांगितले.

म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय या बार्जमधील वाचलेल्यांना नक्कीच आलेला असणार.

Exit mobile version