शास्त्रीय संगीतापासून ते भजनांपर्यंत सर्वत्र गायकांच्या साथीला आढळणाऱ्या पेटीला आता मुंबईतील ओमकार अग्निहोत्री याने नवे स्वरूप दिले आहे. या नव्या स्वरूपाला ओमकारने रेझोनियम असे नाव दिले आहे.
हे ही वाचा:
‘बीबीसी’ च्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींना शिवीगाळ, ट्विटरवर ‘#BoycottBBC’ ट्रेंड!
या बाबत न्युज डंकाशी बोलताना ओमकारने सांगितलं की, पेटी शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, भजने इत्यादींसाठी सर्रास वापरली जाते. पेटीचे एकल वादन सध्या लोकप्रिय होत आहे. परंतु तरीही डीजे, फ्युजन, बँड या प्रकारच्या संगीतासाठी पेटीचा वापर होऊ शकत नाही. मूळ पेटीचा आवाज या प्रकारच्या संगीसाठी कमी असल्याने एका इलेक्ट्रीक उपकरणातून दिल्यामुळे पेटीचा आवाजा इलेक्ट्रॉनिक केला गेला आहे. त्यामुळे आता पेटी या पाश्चिमात्त्य प्रकारांमध्ये देखील वापरली जाऊ शकेल. या कामासाठी साधारणपणे ५ वर्षांचा काळ लागला. आता ही पेटी तयार असून ती वापरता येईल. त्यामुळे आत्तापर्यंत शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत इत्यादी गायन प्रकरारांसाठी वापरली जाणारी पेटी, लवकरच आधुनिक संगित प्रकरांमध्ये देखील आढळणार आहे.
ओमकार अग्निहोत्री हा सुरमणी पंडित उत्तमराव अग्निहोत्री यांचा नातू आहे. तेच त्याचे गुरू होते. त्याबरोबरच तो पंडित विश्वनाथ कान्हेरे आणि उस्ताद सिराज खान यांचादेखील शिष्य आहे.